Uncategorized
प्रसिद्ध शाळेत 8 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

सुसाईड नोट सापडल्याने खळबळ
अकोला /प्रतिनिधी
आईवडील घरी नसताना 8 व्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीने गळफास लावत आत्महत्या केल्याने शहरात खळबळ माजली आहे. ती निशु नर्सरी या प्रसिद्ध शाळेत शिकत होती. मुलीजवळ सुसाइड नोट आढळून आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नगर परिसरातील रहिवासी अवंती भास्कर शेळके (वय-१४) ही प्रसिद्ध निशू नर्सरी स्कूलमध्ये आठवी ‘अ’ वर्गात शिकत होती. शुक्रवारी दुपारी तिचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यांनी फोनवरून मुलीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शंका आली.
त्यांच्या घरातच भाड्याने राहणाऱ्या व्यक्तींना माहिती देऊन चौकशी केली असता, अवंतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. खदान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळली.
अवंती ही एका सुशिक्षित कुटुंबातील कन्या होती. तिची मोठी बहीण एमबीबीएस पदवीधर असून, अवंती देखील अभ्यासात चांगली होती. अशा घरातील मुलीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घटनेचा तपास खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश खंडारे तपास करीत आहेत.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |