हटके

मुलाखती दरम्यान उत्तर देत होता दुसराच आणि उमेदवार करत होता बोलण्याचे नाटक 

Spread the love

                  नोकरी मिळवणे ही काही साधी गोष्ट नाही. प्रथम लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत (इंटरव्ह्यू) हे दोन्ही अडथळे पार केल्यावर मग कुठे तरी तुमच्या हातात नियुक्ती पत्र यायची आशा असते. आपण परीक्षेत कॉफी किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर  किंवा परीक्षार्थी ज्या जागेवर अन्य कोणी परीक्षा दिल्याचे ऐकले असेल. पण लाईव्ह इंटरव्ह्यू दरम्यान उमेदवाराच्या जागी अन्य कोणी ! ही बाब तुमच्यासाठीही नवीन असेल. असाच प्रकार घडला असुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे एका व्हायरल व्हिडीओची. खरंतर नोकरीचा इंटरव्ह्यू देणे हे काम आपल्यासाठी फारच महत्त्वाचे असते. नोकरी मिळावी म्हणून आपल्याला आपल्या बुद्धिचातुर्याचा आपल्या गुणांना समोरच्या व्यक्तीसमोर सादर करायचे असते.

त्याचसोबत आपल्याला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी योग्य पद्धतीनेच द्यायला हवीत. त्यावरून आपल्या गुणांची, बुद्धीची पारख केली जाते आणि आपण त्या नोकरीसाठी किती योग्य आहोत हे इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती ठरवतो. हे खरं आहे की आपल्याला नोकरी मिळाली हे आपला आनंद हा गगनात मावेनासा होतो आणि आपल्या आयुष्याची एक नवी सुरूवात होते. परंतु सध्या एक व्हिडीओ पाहून मात्र एका व्यक्तीने हे कष्ट घेण्याचाही त्रास घेतलेला नाही.

यावेळी एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात एक माणूस हा इंटरव्ह्यू देतो आहे आणि सोबतच तो अगदी आत्मविश्वासाने मुलाखत देतो आहे असं वाटले परंतु तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, हा माणूस स्वत:हून इंटरव्ह्यू देत नसून कोणतरी दुसराच व्यक्ती त्याच्यासाठी इंटरव्ह्यू देतो आहे. यावेळी त्याला इंग्रजीची भीती असेल त्यामुळे त्यांने इंटरव्ह्यू दिला नाही तर स्वत: इंटरव्ह्यू देतोय असं दाखवून त्याच्या पाठीमागे आवाज काढत कोणतरी दुसरीच व्यक्ती बोलते आहे. हे जेव्हा त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीला कळते तेव्हा मात्र तोही शॉक होतो आणि त्याला पकडतो. हे कळल्यावर तो त्याला तिथल्या तिथे रिजेक्ट करून टाकतो. X वर हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वी पोस्ट केलेला पाहायला मिळाला होता.

 

 

 

 

@MallikarjunaNH नावाच्या एका X युझरनं हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ”मुलाखतीदरम्यान ओठ हलवण्याची नक्कल करत होता. हा मेहनती तरुण कोणत्या राज्यातला आहे, अंदाज लावा.” असं एक कॅप्शन यावेळी लिहिले आहे. हा व्हिडीओ 2 दक्षलक्ष लोकांनी पाहिला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते हा व्हिडीओ 10 वर्षांपूर्वीचा असून हा पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्यातून यावेळी हा व्हिडीओ हैदराबादचा आहे असंही काही लोकं बोलत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली अफलातून कमेंट्स केल्या आहेत.

तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता की, या तरूणाचा हा प्लॅन चांगलाच फसला आहे. एवढेच नाही तर जेव्हा मुलाखत घेणाऱ्याला हे कळते की, ही व्यक्ती नाटक करते आहे तेव्हा मात्र ”तू पकडला गेला आहेस, हे योग्य नाही”, असं तो त्याला खडसावून सांगतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close