सामाजिक

 सहाय्यक फौजदाराचा शासकीय निधीवर डल्ला

Spread the love

प्रतिनिधी / नवप्रहार मीडिया 

                    साहाय्यक फौजदाराने शासकीय निधीवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार छावणी येथे घडला आहे. या महानुभवाने बँक खात्यातून 3 लाख 4 हजार  रु परस्पर काढल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ माजली आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामदास शांताराम गायकवाड असे या फसवणूक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. पोलीस ठाण्याच्या मेंटेनन्स, तपासासाठी लागणारा निधी, लाईट बिल असा खर्च या फंडातून केला जातो. नवनियुक्त पोलीस निरीक्षक होळकर यांनी वार्षिक अहवाल तपासला असता त्यामध्ये अनियमता आढळून आली. त्यानंतर अधिक तपास केला असता संपूर्ण प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक डॉ. राजेंद्र नारायण होळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रामदास गायकवाड हे छावणी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गायकवाड यांच्याकडे पोलिसांचा तपास निधी पोलीस मेंटेनन्स लाईट बिल अशा कामांचा हिशोब त्यांच्याकडे होता. हा पदभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याला मोहरील म्हणतात. गायकवाड यांनी 30 एप्रिल 2021 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून शासकीय निधी काढण्यास सुरुवात केली. मात्र त्यांनी त्या निधीची नोंद पोलीस ठाण्यात न करता ती रक्कम परस्पर हडप केली. त्यांनी शासकीय रकमेचा हिशेब न ठेवता अभिलेखांमध्ये चुकीची नोंद करून शासनाची फसवणूक केली. गायकवाड यांनी तीन लाख चार हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक देवकते करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close