सामाजिक

नवजीवन विद्यालयात पत्रकार सत्कार सोहळा

Spread the love

 

पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो -ज्येष्ठ पत्रकार उदयजी निरगुडकर

साकोली:- नवजीवन बौद्धिक विकास संस्था अंतर्गत येथील विद्यालयामध्ये दिनांक 1 सप्टेंबर 2024 पत्रकार सन्मान सत्कार सोहळा पाडला.या पत्रकार सन्मान सोहळ्या चे प्रमुख वक्ते डॉ .उदयजी निरगुडकर वरिष्ठ पत्रकार लेखक तसेच कमलेश भगत सर वायुवेग ॲप्स चे प्रतिनिधी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष के डी लांजेवार अध्यक्ष तालुका सांप्रदाय समिती साकोली तथा प्रमुख पाहुणे माधवराव नवखरे माजी उप प्राचार्य गोविंद विद्यालय पालांदूर , व डॉक्टर सोमदत्तजी करंजेकर संस्था अध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रम दिप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र माझा यावर डॉ. उदयजी निरगुडकर यांनी महाराष्ट्र मध्ये पत्रकारितेचा ठसा उमटवणाऱ्या तत्वांविषयी मार्गदर्शन केले तथा वृत्तपत्राचा संबंध लोकशाहीशी आहे. परंतू लोकशाही आणि वृत्तपत्रांमधील संबंध अलीकडच्या काळात विस्कळीत होतांना दिसून येते. पत्रकारितेतील पावित्र्य लोकमान्य टिळकांसारखे असावे लागते. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असली तरीही दोघांचेही महत्त्व तेवढेच अधोरेखित आहे. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमाची विश्वासहर्ता ही सुदृढ लोकशाहीचे गमक आहे असे ते म्हणाले. त्यामुळे दोन्ही माध्यमांनी देशातील पारदर्शी विकासाचे चित्र मांडले पाहिजे असेही सांगितले. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या हस्ते लेखक, संपादक व झी २४ तास चे पूर्व मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ. सोमदत्त करंजेकर यांनी ग्रामीण भागातील पत्रकार हा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने या सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. के डी लांजेवर व माधवराव नवखरे याचे देखील भाषणं झाली.

कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी रजत पटले, अमित उल्ले, डॉ. लोकानंद नवखरे, डॉ. सुनील चतुर्वेदी, डॉ. जितेंद्र ठाकूर, खेमराज राऊत, चेतन कापगते, बेनीराम बिसेन, अशोक मीना, रूपलाल पारधी, आशिष भिवगडे, राकेश चकोले, सुरज बोधनकर, मधुकर कापगते, ऋग्वेद येवले, सोनू बडवाईक, भावेश लांजेवार, ताराचंद लंजे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला साकोली, लाखांदूर, लाखनी तालुक्यातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोमदत्त करंजेकर, संचालन प्रा. डॉ. रजनी गायधने तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. संजय निंबेकर यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close