अपघात

आणखी एक विमान कोसळले, जीवित हानी नाही 

Spread the love
अमेरिका / नवप्रहार ब्युरो
               विमानला  रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागल्याने अनेक वाहनांना क्षती पोहचली असून काही लोक जखमी झाले आहेत. घटना अमेरिकेच्या स्टेटमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही जण या घटनेत जखमी झाले आहेत. विमानावरील नियंत्रण गमावल्यानंतर पायलटनं एअर ट्राफिक कंट्रोलला एक संदेश पाठवला होता, ज्यामध्ये आता आपण वाचत नाही, असं या पायलटने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर पायलटने अतिशय भावुक होऊन आपल्या पत्नीला देखील एक संदेश पाठवला होता, आता आम्ही वाचणार नाहीत, कृपया माझ्या पत्नीला सांगा मी तिच्यावर खूप प्रेम करतो, मी माझ्या आई वडील आणि तिच्या आई वडिलांपेक्षाही तिच्यावर जास्त प्रेम करतो, असं या पायलटने आपल्या शेवटच्या संदेशात म्हटलं होतं. विमानावरील नियंत्रण सुटल्यानंतर या पायलटने जगण्याची आशा सोडून दिली होती. मात्र या अपघातामधून हा पायलट सुखरूप वाचला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी घडली आहे. गेन्सविले शहराच्या चौकामध्ये एका छोट्या विमानाची एमरजन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न पायलटकडून सुरू होता. विमानाचं एमरजन्सी लँडिंग सुरू असतानाच हे विमान रोडवर कोसळलं, त्यानंतर या विमानाने अनेक वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही लोक जखमी झाले. अपघातापूर्वी या पायलटने धोक्याची सूचना एअर ट्राफिक कंट्रोलला दिली होती, हा आता आपला शेवटचा प्रवास असू शकतो, असं या पायलटला वाटलं होतं, तो प्रचंड तणावात होता, मात्र तशाही स्थितीमध्ये त्याने आपल्या पत्नीला संदेश पाठवला.

या विमानाने गिलमर मेमोरियल एअरपोर्टवरून उड्डाण केलं होतं. उड्डाण केल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाला, त्यामुळे त्याने विमानाचं अपत्कालीन लँडिग करण्याचा निर्णय घेतला. त्याने वर्दळीच्या रस्त्यावर विमानाचं लँडिंग केलं, या विमान अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असता, मात्र सुदैवानं मोठा अपघात टळला आहे, या अपघातामधून हा पायलट सुखरूप बचावला आहे, मात्र या अपघातामध्ये काही लोक जखमी झाल्याची घटना घडली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close