सामाजिक

दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला

Spread the love
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
            मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आर्वी (जळगाव ) शिवारातील विहिरीत सापडला आहे. त्याच्या बेपत्ता होण्यामागे कौटुंबिक वाद असल्याची चर्चा आहे.
          मागील दोन दिवसांपूर्वी दत्तापुर ( हमाल पुरा ) निवासी प्रवीण मुलवंडे हा युवक घरातून निघून गेला होता.शोध घेऊन देखील तो मिळून न आल्याने दत्तापुर ठाण्यात त्याच्या मिसिंग ची तक्रार दाखल करम्यात आली होती. दत्तापुर पोलीस त्याचा शोध घेत असतांना आर्वी शिवारातील विहिरीत यरका मृतदेह असल्याची बातमी कळल्यावर दत्तापुर पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
             उपस्थितांनीं हा मृतदेह प्रवीण मुकवंडे याचा असल्याचे सांगितले. कौटुंबिक कारणामुळे प्रवीण ने असे पाऊल उचलल्याचे नागरिकांचे म्हणनेआहे. त्याला यरका मुलगा आणि एक मुलगी असे अपत्य असून म्हातारी आई आहे. पत्नी फार पूर्वी त्याला सोडून गेली होती अशीही  चर्चा आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close