क्राइम

घरीच केला गर्भपात  अतिरक्तस्त्रावा मुळे महिलेचा मृत्यू 

Spread the love

तिसरी देखील मुलगी असल्याच्या संशयातून केला गर्भपात? 

इंदापूर / नवप्रहार डेस्क 

                     गर्भवती महिलेचा घरीच गर्भपात करण्यात आल्याने अतिरक्तस्त्राव झाला. आणि त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. भ्रूनाचा मृतदेह शेतात पुरण्यात आले असल्याचे देखील उघड झाले आहे. महिलेच्या भावाच्या तक्रारी नंतर पती, सासरा यांना अटक केली आहे.तसेच सासू विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ऑपेरेशन करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी सुरु असल्याचे  पोलिसांनी सांगितले आहे. महिलेला पहिलेच दोन मुली असल्याने तिसरी मुलगी होण्याच्या भीतीने हा प्रकार करण्यात आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. महिलेला दोन मुली आहेत. ती तिसऱ्यांदा गरोदर होती. पोलिसांना संशय आहे की, महिलेला तिसऱ्यांदा देखील मुलगी होत असल्याचं कुटुंबाला कळालं होतं. त्यामुळे त्यांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता.

सोमवारी अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेची तब्यत गंभीर बनली होती. त्यामुळे महिलेला पुढच्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, त्याठिकाणी महिलेचा मृत्यू झाला. यासंदर्भातील माहिती इंदापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मृत महिलेच्या भावाने याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.भ्रूणाचा मृतदेह आढळला असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी कलम ९१,९० आणि ८५ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close