क्राइम

मुलीने आईच्या स्वप्नात येऊन सांगितला सर्व प्रकार आणि बंद पडलेली फाईल पुन्हा उघडली

Spread the love

वॉशिंग्टन / नवप्रहार न्यूज नेटवर्क .

                     रात्रीला जवळपास सगळ्यांनाच स्वप्न पडतात. त्यात काही आनंदी, काही भयानक तर काही विचित्र असतात. पण मृत मुलीने स्वप्नात येऊन आईला तिचा स्वाभाविक मृत्यू झाला नसून तिला पतीने ठार मारले आहे.आणि कसे मारले याचे वर्णन देखील केले. त्यामुळे आईने पोलिसांकडे जाऊन त्या घटनेची फाईल पुन्हा उघडायला लावली. आणि त्यानंतर जे समोर आले ते धक्कादायक होते.

 कधी मृताने स्वतःच स्वतःच्या मृत्यूची साक्ष दिल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असं तुम्ही फिल्ममध्ये पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात अशी साक्ष ग्राह्य धरली जात नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटले अशाच मृताच्या साक्षीने एका गुन्हेगाराला शिक्षा देण्यात आली आहे. अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनियातील हे विचित्र प्रकरण. एल्वा जोआना हेस्टर श्यू नावाच्या महिलेचं इरास्मस नावाच्या पुरुषाशी लग्न झालं. पण लग्नानंतर तीन महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. ती जिन्यावरून खाली पडली.

त्यानंतर इरास्म तिला खोलीत घेऊन गेला. डॉक्टर तपासणीसाठी आले तेव्हा तो खूप रडत होता. जोआनाच्या मृतदेहाला मिठी मारून मारून ढसाढसा रडू लागला. डॉक्टरांनी मृत्यचं कारण नैसर्गिक असल्याचं घोषित केलं.

जोनाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली, इरास्मसचे अश्रू थांबत नव्हते. पत्नीच्या मृत्यूचा धक्का तो सहन करू शकत नाही, असे श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या लोकांना वाटत होतं. सर्वजण त्याला धीर देत होते. पण जोआनाची आई मेरी जेनला मात्र त्याच्यावरच संशय होता.

 कारण जोआनाने घरी हायनेक गाऊन घातलेला नव्हता, पण मृत्यूवेळी तिने तो परिधान केला होता. शिवाय इरॅस्मस तिचा मृतदेह पूर्ण झाकत होता. लोकांनाही तिच्या मृतदेहाजवळ येण्यापासून रोखत होता. जेव्हा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात होता तेव्हा कवटीत असामान्य हालचाल होती सहजा नैसर्गिक मृत्यूत असं होत नाही.

यानंतर मेरीला एक स्वप्न पडलं. तिच्या मुलीचा आत्मा तिच्या स्वप्नात आला. ती म्हणाली, मुलीच्या आत्मात्याने तिला तिच्या पतीने कसं मारलं आणि हत्येचं कारणही सांगितलं. जोआनाच्या आत्म्याने सांगितलं रात्रीच्या जेवणानंतर इरास्मसशी तिचा वाद झाला.

त्यानंतर त्याने तिची गळा दाबून हत्या केली. इतकंच नव्हे तर मृत्यू नैसर्गिक वाटावा म्हणून तिला हायनेक गाऊन घातला. यानंतर मेरीने जोआनाची केस पुन्हा उघडली. तपास केला असता सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या. इरास्मसनेच जोआनाची गळा दाबून हत्या केली होती. कोर्ट आणि पोलिसांनीसुद्धा आत्म्याची साक्ष ग्राह्य धरली आणि अखेर मारेकऱ्याला शिक्षा झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close