गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला बिटरगाव पोलिसांनी केले जेरबंद
गुप्तधन काढण्याच्या साहित्यासह पाच जणांना अटक
उमरखेड :(शहर प्रतिनिधी) तालुक्यातील ढाणकी शहरात व परिसरात मागील काही दिवसा पासून गुप्तधन काढन्याचे प्रमाण वाढले होते. अशातच दि.10/05/2024 रोजी चे अक्षयचतुरतिचे मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत असल्याबाबतची माहिती बिटरगाव पोलिसांना लागली मिळालेल्या माहिती वरून ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामीलावाड यांचे शेतात छापा टाकून 1) जीवन गोविंद जाधव वय 25 वर्षे रा. टेंभुरदरा 2) संतोष हरीसिंग राठोड वय 48 वर्षे रा बाळदी 3) अभिजीत गणेश मामीलवाड वय 25 वर्षे रा ढाणकी 4) सर्वजीत कांनबा गंगनपाड वय 25 वर्ष ढाणकी 5) पंडित विश्वनाथ राठोड वय 45वर्ष रा चिल्ली. सर्व ता उमरखेड जि यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून
पाच मोबाईल एकूण किंमत 28000/- व तीन मोटरसायकल किंमत- 120000/- , डीप सर्च मेटल डिटेक्टर किंमत 60000/- व एक थापीच्या आकाराचा चाकू किंमत 500 /- रुपये असा एकूण 208500 /-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरून दत्ता कुसराम यांचे फिर्याद वरून वरील आरोपी विरुद्ध अपराध न.184/24 कलम 3(2)3(3) महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला सदर
ची कारवाही मा. पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रेमकुमार केदार, पोहेका रवी गिते, पोलीस नायक गजानन खरात,पोका, निलेश भालेराव, अंबादास गारुळे, प्रवीण जाधव, प्रकाश मुंढे, चालक मंगेश हुलगुंडे यांनी केली पुढील तपास वरिष्ठयांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय साळुंके पोलीस स्टेशन उमरखेड करत आहेत अशा पद्धतीने गुप्तधन काढण्याच्या नादात अघोरी कृत्य करून यात नरबळी सारख्या घटना घडत असतात बिटरगाव पोलिसांच्या जागरूकतेमुळे गुप्तधन काढणाऱ्या टोळीचा वेळीच छडा लागल्यामुळे पुढील अनर्थ तळला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी शहर व परिसरातून ऐकायला मिळत होत्या