क्राइम

अमेरिकन महिलेला दारू पाजून सामूहिक बलात्कार 

Spread the love

केरळ / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                   केरळ कॅब्या कोल्लम येथे समुद्र किनारी एकट्या बसलेल्या अमेरिकन महिलेला दारू पाजून तिच्यावर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिला काही दिवसांपूर्वीच भारतात आली होती. आणि येथे एका आश्रमात वास्तव्यास होती. या दोघांनी तिला तिला पहिले सिगारेट ऑफर केली तिने नकार दिल्यावर तिला दारू ऑफर केल्या गेली.यावेळी ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही.  दारू पिताच तिला नशा चढली . याचा फायदा घेत हे दोघे नराधम तिला निर्जनस्थळी घेऊन गेले. आणि  तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

ही घटना केरळमधील कोल्लम येथील आहे. अमेरिकी महिलेवर कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन लोकांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला नुकतीच भारतात आली होती व कोल्लममधील एका आश्रमात राहिली होती. पोलिसांनी सांगितले की, दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ डी (सामूहिक बलात्कार) आणि ३७६(२)(एन) सह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ही घटना ३१ जुलै रोजी घडली आहे. पीडित ४४ वर्षीय महिला आश्रमजवळ एका समुद्रकिनारी बसली होती.

महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी तिच्याजवळ आले आणि सिगरेट शेअर करण्याची ऑफर केली. जेव्हा महिलेने याला नकार दिला त्यानंतर त्यांनी तिला दारू ऑफर केली. दारू घेताच तिला नशा झाली. त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून रिकाम्या घरात नेले व तेथे तिच्यावर दोघांनी अनेक वेळा सामूहिक बलात्कार केली. महिलेने एक ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिला २२ जुलै रोजी केरळमध्ये आली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close