सामाजिक

टेंभूरखेडा येथील तरूणाची गळफास घेवुन आत्महत्या.

Spread the love

 

वरूड/तूषार अकर्ते

येथुन जवळच असलेल्या टेंभुरखेडा येथील निरज साहेबराव देशमुख (२७) युवकाने राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
निरज हा उच्च शिक्षित होता. गेल्या एक महिन्यापुर्वीच तो शहरातील एका खाजगी शाळेवर ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी निरज देशमुख रुजु झाला होता. गेल्या ३ दिवसांपासुन तो तणावाखाली होता आणि मला जगण्याचा कंटाळा आला आहे, असे तो सतत म्हणत होता. असे त्याच्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. त्याच्या वडिलांना तो फाशी घेतलेल्या स्थितीत त्याच्या खोलीमध्ये आढळुन आला. त्यानंतर त्यांनी आजुबाजुचे नागरिक व नातेवाईकांना याबाबत माहीती दिली.पोलिसांना माहीती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठुन मृतदेहाचा पंचनामा करुन पार्थिव उत्तरीय तपासणीकरीता रवाना केले. यासंदर्भात नरेंद्र साहेबराव पंडागळे यांचे फिर्यादी वरुन वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असुन पुढील तपास सुरु आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close