अंजनगावात संत रुपलाल महाराज पुण्यतिथी सोहळ्याला सुरुवात

श्रीराम कथा कीर्तनाने होणार परिसर भक्तिमय
अंजनगावसुर्जी -मनोहर मुरकुटे
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील आराध्य दैवत संत रुपलाल महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री राम कथा कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून आजपासून शनिवार पासून विठ्ठल मंदिर परिसरातील समोरचे प्रांगणात सुरुवात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्मिती झाली आहे
कथा सप्ताह शनिवार पासून सुरुवात होऊन सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ यावेळेत अकोट येथील पुरुषोत्तम महाराज नेमाडे यांच्या वाणीतून ज्ञानेश्वरी पारायण होणार असून दैनंदिन दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १० यावेळेत वढाळी नांदुरा येथील रामायनाचार्य दिनेश महाराज वक्ते यांच्या वाणीतून श्रीराम कथेचा लाभ भक्तगणांना घेता येणार आहे येथील विठ्ठल मंदिर परिसरातील नरेंद्र नगर मधील खुल्या जागेवर भव्य मंडप टाकून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहभर या परिसराला भक्तांच्या गर्दीचे स्वरूप प्राप्त होणार आहे कार्यक्रर्माची सांगता दि १३ ला संत रुपलाल महाराज पालखी रथाची शहरातून शोभायात्रा निघणार असून या दिवशी अकोट येथील पुरुषोत्तम महाराज नेमाडे यांच्या वाणीतून काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता होणार आहे पंचक्रोशीतील भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत रुपलाल महाराज मंदिर ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे
सद्यस्थितीत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व रणधुमाळी सुरू झाली असून व सदर कार्यक्रम हा भक्तिमय व सामाजिक असल्याने कार्यक्रमाला येणाऱ्या भक्तांनी अध्यात्मिक दृष्टीकोनातूनच आचरण करावे आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे शिवाय प्रशासनाच्या वतीने सुद्धा सर्वकाळ निरीक्षण राहणार असल्याची माहिती मिळाली आहे