विदेश
इंडोनेशिया / नवप्रहार मीडिया ऑनलाईन
पावसाळ्याच्या दिवसात निसर्गरम्य ठिकाणी अनेक लोक फिरायला जातात. आणि त्याठिकाणी ते सेल्फी किंवा फोटो काढतात. नवीन लग्न झालेले कपल देखील देश आणि विदेशातील काही नैसर्गिक सौंदर्य असलेल्या ठिकाणी जातात. त्यावेळेस ते सेल्फी किंवा फोटो काढतात.यावेळी ते सगळेच भान हरपतात .त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की हे फोटो आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवून वाहवा लुटावी. ते फोटो शेशन मध्ये गुंग असताना विपरीत घडते. असेच विपरीत एका जोडप्यासोबत घडणार होते. पण फोटो ग्राफरचे वेळीच लक्ष गेले अन त्यांचा जीव वाचला
निसर्गरम्य ठिकाणी फोटो सुंदर येतात आणि अशा ठिकाणी वेळ घालवणं देखील फार अविस्मरणीय असतं. पण कधी कधी निसर्ग असं काही रौद्र रुप दाखवतो की त्याची आपल्याला भीती वाटू लागते. हल्लीच फोटो आणि सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले प्राण गमवल्याचे तुम्ही ऐकले असेल किंवा पाहिले देखील असेल. सध्या समोर आलेला व्हिडीओ असाच काहीसा आहे.
परंतु यामध्ये कॅमेरा मॅनच्या दक्षतेमुळे कपलचे प्राण वाचले आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये इंडोनेशियातील बाली येथील एंजल्स बिलाबोंगचे एक सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता, जिथे नद्या आणि धबधबे डोंगराच्या मधोमध वाहताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत टेकडीच्या एका बाजूला उभं राहून एक जोडपं फोटो काढण्यासाठी पोज देताना दिसतं, पण तेव्हाच फोटोग्राफरला कुठल्यातरी अनुचित घटनेचा संकेत मिळतो, ज्यामुळे तो जोडप्याला लगेचच मागे बोलावतो.
तेवढ्यात पाण्याची एक उंच लाट येते आणि ती जोरदार येऊन आदळते जिथे आधी हे कपल उभे असते. कॅमेरा मॅनने आधीच या कपलला सावध केले नसते, तर कदाचित ते दोघेही तोल जाऊन उंचावरुन खाली पडले असते. इंस्टाग्रामवर आतापर्यंत या व्हिडिओला 12 लाख 40 हजार लाइक्स मिळाले असून लोक कमेंट करून फोटोग्राफरच्या समजूतीचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘कॅमेरा मॅनवर नेहमी विश्वास ठेवा.’
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |