……अन तिने मगरीचे शेपूट तळून खाल्ले
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
जगात अनेक विचित्र घटना घडत असतात. त्यावर सहसा विश्वास करावा किंवा नाही हा प्रश्न मनाला पडतो. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओस व्हायरल होत असतात. त्यात काही विचित्र असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका मुलीला मगरीची शेपूट साफ करुन तिचे तुकडे करुन त्यांना फ्राय करतांना आणि खातांना दाखवले आहे. ting_tong80 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे
मगर ही घातक प्राण्यांपैकी एक आहे . पाण्यात तिची शक्ती प्रचंड असते. मगर प्राण्यांची शिकार करून खाते. मगरीला लोकं घाबरतात. तर काही लोक तर मगरीला खातातही. मगरींविषयी वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तरुणी मगरीचं शेपूट खात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.
मगरीला खाण्याचा तुम्ही कधी विचार केलाय का? बरेच असे लोक आहेत जे आवडीनं मगर खातात. त्यांचे व्हिडीओ, फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एका व्हिडीओ सध्या समोर आलाय. ज्यामध्ये पहिला मगरीचं शेपूट धुवून, शिजवून खातेय.
मगरीच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी मगरीचं शेपूट खासून धुते. नंतर त्याची त्वचा काढते आणि मांसचे तुकडे करते. मांसंला वेगवेगळ्या पदार्थामध्ये मिक्स करुन शिजवते. नंतर त्याला तेलात फ्राय करते आणि चवीनं खाते. हा व्हिडीओ पाहून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी याविषयी विचित्र रिअॅक्शन दिलीय तर काहींनी याला टेस्टी दिसत असल्याचं म्हटलंय. एकंतरीत अशा मिक्स रिअॅक्शन या व्हिडीओवर येत आहेत.
काही सेकंदांची ही मगरीची रेसिपी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या प्राण्यांच्या रेसीपीचे व्हिडीओ समोर आले आहेत. लोक हे आवडीनं खातात मात्र काही ठिकाणी याचा विचारही कोणी करु शकत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे.