क्राइम
कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला विरोधात तक्रार असल्याचे सांगून ठेवले आणि केला अत्याचार

प्रतिनिधी मुंबई
ऑफसेट कंपनीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला (16) विरोधात तक्रार असल्याचे सांगून तिला कंपनीत थांबायला सांगून तिच्यावर सलग दोन दिवस बलात्कार केल्याची घटना वसई पूर्वेकडील सातिवली येथील एका कंपनीत घडली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी कंपनीच्या कार्यालयात आणि गच्चीवर ही घटना घडली. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीला पकडण्यात वालीव पोलिसांना यश आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 16 वर्षांची असून वसई पूर्वेच्या सातिवली येथील एका ऑफसेट प्रिंटीग कंपनीत काम करते. 31 डिसेंबर रोजी कंपनीचा मालक प्रदीप प्रजापती (50) याने पीडित मुलीला तिच्या विरोधात तक्रार आहे असे सांगितले. त्यावर तोडगा काढण्याचे कारण सांगून कार्यालयात बोलावले आणि दुपारी साडेतीनच्या सुमारास तिच्यावर कार्यालयात अत्याचार केला.
मोठ्या शेठला तुला भेटायचे, गच्चीवर नेले अन्
या प्रकरणाने पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. तरी दुसर्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी ती कामावर आली. संध्याकाळी सर्व कर्मचारी घरी गेल्यावर प्रजापती याने तिला मोठ्या शेठला तुला भेटायचे आहे असे सांगून थांबवून ठेवले. त्यानंतर तिला कंपनीच्या गच्चीवर नेले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. अखेर पीडित मुलीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी अटकेत
याबाबत वालीव पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप प्रजापती याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 65(1) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो) च्या कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी आमच्याकडे घटना घडल्यानंतर आली होती. मात्र कंपनी बंद होती. आरोपी निष्पन्न झाला असून त्याला अटक केली आहे अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी दिली.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |