हटके

मुस्लिम तरुणीशी  प्रेमसंबंध असलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे 8 तुकडे करून पोत्यात भरून फेकले 

Spread the love

मुस्लिम तरुणी  प्रेमसंबंध असलेल्या रुणाच्या मृतदेहाचे 8 तुकडे करून पोत्यात भरून फेकले 

चंबा ( हिमाचल प्रदेश) / नवप्रहार न्यूज नेटवर्क

 दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांडाची बरीच चर्चा झाली. त्यानंतर मुंबईत लिव्ह-इन पार्टनरने त्याची प्रेयसी सरस्वतीचे अनेक तुकडे केले.

                   प्रेमात बिनसल्याने तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकल्याचा काही घटना मागील काही काळात घडल्या आहेत. या घटनांची देशात जबरदस्त चर्चा देखील रंगली होती. पण हिमाचल प्रदेश च्या चंबा येथे तरुणांच्या मृतदेहाचे 8 तुकडे करून ते पोत्यात भरून फेकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.” या युवकाचे मुस्लिम तरुणी सोबत प्रेमसंबंध असल्याने हा प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे.

दिल्लीतील श्रध्दा वालकर हत्याकांडाची बरीच चर्चा झाली. त्यानंतर मुंबईत लिव्ह-इन पार्टनरने त्याची प्रेयसी सरस्वतीचे अनेक तुकडे केले. आता असेच एक प्रकरण हिमाचल प्रदेशात समोर आले आहे. हिमाचलच्या चंबा येथील मनोहर लाल हत्या प्रकरणही चर्चेत आहे. येथे प्रेमप्रकरणातून 21 वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेहाचे आठ तुकडे करून पोत्यात बांधून फेकण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चंब्याच्या सलुनी येथील किहार भागातील भंडल गावातील आहे. मनोहल लाल (21) याचे मुस्लिम समाजातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. यादरम्यान हा तरुण 6 जून रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर पोलिसांचे गस्ती पथक या परिसरात गस्त घालत असताना त्यांना नाल्यात दगडाखाली तरुणाचा मृतदेह पोत्यात सापडला. तरुणाच्या शरीराचे 7-8 तुकडे करण्यात आल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. त्याच्या शरीराचे काही भाग नाल्यात फेकून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर एसपी अभिषेक यादव यांनी सांगितले की, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा आरोपी मुस्लीम तरुणीचा भाऊ असल्याचे समजत आहे.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close