अपघात

ट्रकच्या धडकेत महिला डॉक्टर चा मृत्यू 

Spread the love

उंड्री ( विशेष प्रतिनिधी )

                   भरधाव ट्रकने स्कुटी चालक महिलेने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. डॉ. प्रणाली तन्मय दाते (वय-३४ वर्ष, रा. अर्बन नेस्ट सोसायटी, उंड्री) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहेघटना बुधवारी उंड्रीतील कानडे नगर येथे घडली.  दाते या साडे बारा वाजण्याच्या सुमारास उंड्रीकडून हांडेवाडीच्या दिशेने जात होत्या, त्याच वेळेस मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. त्या रस्तावर पडल्या असता त्यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात एवढा भीषण होता कि, डोक्यातून बाहेर आलेला मेंदू रस्त्यावर छिन्नविछिन्न झाला. ट्रक चालक पांडुरंग बलभीम भोसले (वय-३५ वर्ष, मूळ गाव तुळजापूर, धाराशिव) याने घटनास्तलावरून पलायन केल्याने ‘सीसीटीव्ही’च्या आधारे शोधून अटक करण्यात आली. असे काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांनी सांगितले.

जड वाहतूक आणि डंपर वाहतुकीचे वाढते प्रस्त यामुळे हा भाग मृत्यूचा सापळा होत आहे. प्रशासनाचे यावर योग्य नियंत्रण असणे गरजेचे आहे. या भागात रोज छोटे अपघात होत असतात.रोज एका व्यक्तीवर प्रथम उपचार करावा लागत असल्याने आम्ही यासाठी लागणारे साहित्य हाताशीच ठेवलेले असते, असे येथील व्यवसायिक अनिल कानडे आणि नवनाथ चव्हाण यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close