क्राइम

कथित अनैतिक प्रेम संबंधात तरुणाचा बळी; आठ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न 

Spread the love

धाराशिव / क्राईम रिपोर्टर

                लग्नाला जेमतेम आठ महिने झालेल्या तरुणाची हत्या झाली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने ही हत्या केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिसांनी पत्नी आणि तिचा कथित प्रियकर याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धाराशिवमधील वाशी तालुक्यातील रामकुंड शिवरात ही घटना घडली. गोविंद शिवाजी कागदे (वय 27) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. कुंथलगिरीच्या डोंगरामध्ये गोविंद याचा मृत्यू आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोविंदच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले होते. गळ्यावरही धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा होत्या, एवढंच नाहीतर आरोपींनी गोविंदच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा जीव घेतला.

८ महिन्यापूर्वीच गोविंदचं झालं लग्न

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला असता, गोविंदचं लग्न हे ८ महिन्यांपूर्वीच अंजली नावाच्या तरुणीशी झालं होतं. पण, हे लग्न अंजलीच्या इच्छेविरोधात झालं होतं. अंजलीचं आरोपी शुभम खोसे नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते, असा आरोप केला जात आहे. या दोघांच्या प्रेमसंबंधात आता गोविंद हा अडथळा येत होता. त्यामुळे दोघांनी गोविंदचा काटा काढण्याचं ठरवलं. पत्नी अंजली आणि तिच्या प्रियकराने मिळून गोंविदचा खून केला, असा आरोप नातेवाईकांनी केला.

या प्रकरणी मृत गोविंद यांचा चुलत भाऊ  ज्ञानेश्वर बाजीराव कागदे यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नी अंजली गोविंद कागदे आणि तिचा प्रियकर शुभम सुभाष खोसे या दोघांनी मिळून गोविंद यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारने पोलिसांनी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. गोविंद यांचा खून करण्यामागे आणखी काही कारण आहे का, या प्रकरणा आणखी कुणी सहभागी आहे का? याचा अधिक तपास पोलीस करत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close