क्राइम

तरुणाचा संशयास्पद मृत्यू, अघोरी पूजेच्या नावाखाली नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

Spread the love

विशेष प्रतिनिधी /अकोला

                 अकोला येथून एक खळबळ माजविणारी बातमी समोर येत आहे. येथील हेमंत प्रफुल सपकाळ (29) याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अघोरी पूजेच्या नावाखाली त्याचा नरबळी दिल्या गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. 

आमच्या मुलाचा नरबळी दिला गेला असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी मांत्रिकाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत प्रफुल्ल सपकाळ (वय 29) असं मृत तरुणाचं नाव आहे. विकी नामक मांत्रिकाने दिलेल्या सल्ल्यावरून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी हेमंत सपकाळ याचा पैशासाठी नरबळी केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.. दोन मित्रांसोबत तो अकोल्याच्या राहत्या घरून मध्यप्रदेश मधील इंदुर इथं जाण्यासाठी निघाला होता. तिथेचं पैशाचा पाऊस पाडण्याच्या अघोरी पूजेच्या दरम्यान हेमंतचा नरबळी दिला, असा आरोप सपकाळ कुटूंबीयांनी केला आहे.

याशिवाय विकी नामक मांत्रिकाचे अघोरी पूजेचे व्हिडिओ न्यूज 18 मराठी च्या हाती लागला आहे. पूजा दरम्यान तो लिंबू हवेमध्ये उचलताना दिसत आहे. याच पूजा वेळी तो इतरांना घाबरून न जाण्याच आवाहन देखील करताना दिसतोय. या प्रकरणात अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन आणि इंदुर पोलीस तपास करत आहे.

भावाने तक्रारीमध्ये काय म्हटलंय?

मयत हेमंतचा भाऊ मुकूंद सपकाळ याने अकोला पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीत मुकूंद सपकाळ म्हणाले की, “माझा भाऊ हेमंत प्रफुल्ल सपकाळ हा दिनांक १२.११.२०२६ रोजी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान विवेक उर्फ विक्की शिंदे आणि अजय गायकवाड आणि आणखी एक व्यक्ती, असे तिघेही राहणार मोठी उमरी अकोला यांच्या सोबत अमरावतीला जात आहे, असं सांगून घरून गेले. त्यानंतर त्याच्याशी रोज बोलणं मोबाईलच्या माध्यमातून सुरू होतं.

पण दिनांक १५.११.२६ दुपारी २.०० वाजता बोलणं झालं तेव्हा उद्या घरी येतो असं, तो म्हणाला होता. परंतु, याच दिवशी संध्याकाळी फोन आला तेव्हा तो म्हणाला “माझा जीव धोक्यात आहे. मला हे आज रात्री मारणार आहेत”. जेव्हा त्याला विचारले “तू कुठे आहेस, तेव्हा तो म्हणाला मी इंदुरला आहे. त्याला विचारले, “तू तिथे का गेलास?, तेव्हा तो म्हणाला हे मला घेऊन आलेत. मला वाचवा. तो म्हणाला मी यांच्यापासून दूर आहे आणि विवेक उर्फ विक्की मला फोन करून बोलावत आहेत, आम्ही त्याला म्हटलं जावू नको. त्यानंतर त्याचा फोन बंद पडला.

हेमंतच्या मृत्यू झाल्याचं कळालं

यांनतर रात्री १२ वाजता मी विवेक उर्फ विक्कीला फोन केला तेव्हा विक्की म्हणाला “आम्ही रेल्वेमध्ये आहोत आणि तो मागच्या डब्यात आहे”. दिनांक १६.११.२६ ला संकाळी ११ वाजताच्या सुमारास हेमंतचा फोन चालू झाला. तर मी त्यावर कॉल तर दुसऱ्या बाजून पोलीस बोलले. तुम्ही इंदुर ला एम.जी. रोड पोलीस स्टेशनला या, तो मृत झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यांनतर आम्ही दिनांक १६.११.२६ च्या रात्री इंदुर इथं पोहोचलो आणि दिनांक १७.११.२६ ला त्याचं पीएम करून त्याला अकोला मोठी येथील स्मशान भूमीत अत्यंसस्कार केले.

विवेक उर्फ विक्की शिंदे हा गुंड प्रवृत्तीचा असून त्यावर गुन्हे दाखल आहेत, तसंच तो जादुटोणा आणि गुप्तधन शोधण्याची कामं करतो, तसे त्याचे व्हिडीओ आहेत. आम्हाला खात्री आहे की, विवेक उर्फ विक्की शिंदे आणि त्याचे साथीदार यांनी माझ्या भावाचा याच कामासाठी खून केला किंवा बळी दिला. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी आपण करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यासाठी तपास करून गुन्हा दाखल करावा व मला आणि माझे कुटूंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी मुकूंद सपकाळ याने केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close