अजब गजब

धडाम असा आवाज आणि शेतकऱ्यांनी घेतली शेताकडे धाव

Spread the love

सात किलो वजनाचा बर्फाचा गोळा ऊसाच्या फडात

शेतात पडला भला मोठा खड्डा, सहा तासानंतरही बर्फ वितळेना 

शिराळा तालुक्यातील मांगले येथे रविवारी सकाळी अवकाशातून तब्बल सात किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा उसाच्या शेतात कोसळल्याची आश्चर्यकारक घटना घडली. मोरणा नदीकाठावरील समीर रमेश कुलकर्णी यांच्या शेतात सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

 सांगली / विशेष प्रतिनिधी

म्हणतात न की निसर्गाच्या किमयेपुढे सगळे हतबल आहेत.निसर्गाच्या किमयेची प्रचिती आणून देणारा प्रकार याठिकाणी घडला आहे. सध्या अंगाला झोंबणार ऊन असताना देखील आकाशातून सात किलो वजनी बर्फाचा गोळा शेतात पडला आहे. त्यामुळे त्याठिकाणी भला मोठा खड्डा पडला आहे.विशेष बाब अशी की सहा तासानंतरही बर्फ वितळले नव्हते.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे काल रविवारी सकाळी अवकाशातून तब्बल सात किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा उसाच्या शेतात कोसळल्याची आश्चर्यकारक घटना घडली. मोरणा नदीकाठावरील समीर रमेश कुलकर्णी यांच्या शेतात सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

आवाजासह बर्फाचा गोळा जमिनीवर आदळला

प्रचंड वेगाने आणि मोठा आवाजासह बर्फाचा गोळा जमिनीवर आदळल्याने शेतात मोठा खड्डा पडला. विशेष म्हणजे, सहा तासांनंतरही बर्फ पूर्णपणे वितळला नव्हता. या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त होत आहे.

ड्रोनसारखी एखादी वस्तू खाली येताना दिसली

मांगले येथील मोरणा नदीकाठावर समीर कुलकर्णी यांचं उसाचं शेत आहे. काल रविवारी सकाळी गावडे हे शेतात ठिबक सिंचनाच्या पाईप पसरवत होते. त्यावेळी त्यांना आकाशातून ड्रोनसारखी एखादी वस्तू खाली येताना दिसली.

परिसरातील शेतकरीही हादरले

काही क्षणांतच ही वस्तू प्रचंड वेगाने कुलकर्णी यांच्या उसाच्या शेतात आदळली. त्याचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील शेतकरीही हादरले. आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर शेतात मोठा खड्डा पडल्याचं आणि त्यामध्ये बर्फाचा मोठा गोळा फुटलेल्या अवस्थेत असल्याचं दिसलं. या गोळ्याचं वजन अंदाजे सात किलो असल्याचं सांगण्यात आलं आहे.

नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

सध्या धुके किंवा कडाक्याची थंडी नसताना तसेच उन्हाळ्यासारखं वातावरण असताना आकाशातून बर्फाचा गोळा पडल्यानं नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त होत आहे.

बर्फाचे मोठे गोळे तयार होतात

काहीवेळा पावसाळी ढगांशिवाय वातावरणातील बाष्प एकत्र येऊन बर्फाचे मोठे गोळे तयार होत असतात. त्याचे वजन काही ग्रॅमपासून ते ५० किलोपर्यंत असते. आकाशात वातावरणातील विशिष्ट दुर्मिळ बदलांमुळे तयार होतात.

तज्ज्ञांनी काय म्हटलं?

अशा घटनांमागे हवामानातील अनपेक्षित बदल कारणीभूत असू शकतात. वातावरणाच्या वरच्या थरातील अत्यंत कमी तापमानामुळे निर्माण झालेले बर्फाचे गोळे गुरुत्वाकर्षणामुळे खाली आदळण्याची शक्यता असते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close