क्राइम

बनावट वैद्यकीय डिग्री देणाऱ्या रॅकेट चा पोलिसांनी केला पर्दाफाश

Spread the love

पाच आरोपींना अटक, MBA उत्तीर्ण आणि डॉक्टरी व्यवसाय करत असलेला व्यक्ती मास्टरमाईंड

बुलंदशहर/विशेष प्रतिनिधी

           आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे अशी अनेक पालकांची इच्छा असते. आपल्या देशात वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळविण्यासाठी NEET प्रवेश परीक्षा पास करणे अत्यावश्यक आहे. आणि नुकतेच NEET  परीक्षेचे पेपर फुटल्याने देशात रणकंदन माजले होते. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

डॉक्टर बनविण्यासाठी पालक आपल्या मुलांना परदेशात देखील पाठवतात. परदेशात वैद्यकीय डिग्री मिळाल्यावर त्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस सुरू करता येत नाही. त्यासाठी त्यांना FMGE जी नॅशनल बोर्ड ऑफ एक्सझामिनेशन इन मेडिकल सायन्सेस या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येते देणे आणि त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा अत्यंत कठीण समजली जाते. यावर उपाय म्हणून या रॅकेट ने बनावटी डिग्री बनवून देण्याचा मार्ग निवडला होता. पण पोलिसांनी आता. रॅकेट चा पर्दाफाश केला आहे.

५ आरोपीना अटक 

महाराष्ट्र सायबर पोलीस शाखेने परदेशी वैद्यकीय पदवीधर विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली परीक्षा उत्तीर्ण नं करता वैद्यकीय नोंदणी मिळवून देणाऱ्या आंतरराज्य रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यात २ आरोपीना अटक झाली. आता या प्रकरणात अटक झालेल्या आरोपीची संख्या ५ वर पोहचली आहे. खाते प्रमुख डीआयजी अजय बन्सल यांनी माध्यमांना सांगितले की तांत्रिक तपास व डिजिटल पुरावा या आधारे ही फसवणूक उजेडात आली आहे.

आरोपी असे आहेत

अटक करण्यात आलेल्यात एक आरोपी शिवम राकेश हा उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा असून तो तिथे स्वतःचे रुग्णालय चालवितो. त्याच्याकडे MBA ची पदवी आहे. तोच या फसवणूकीचा मास्टर माईंड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने ३० पेक्षा अधिक लोकांना बनावट प्रमाणपत्रे दिली आहे. दुसरा आरोपी धर्मेंद्र लक्ष्मण सिंग हा भोपाळचा रहिवासी आहे.

असा आहे निर्बंध

नियमानुसार विदेशातून वैद्यकीय पदवी घेऊन भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल बोर्ड ऑफ एक्सझामिनेशन इन मेडिकल सायन्सेस या संस्थेतर्फे आयोजित होणारी FMGE ही चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतरच या विदेशी पदवीधरक डॉक्टरांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्याची नोंदणी मिळू शकते. मात्र या टोळीने अश्या विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे पुरवून नोंदणी मिळवून दिली, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

FMGE परीक्षा काय

ही परीक्षा अनिवार्य आहे. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम ही एक पात्रता परीक्षा आहे. रशिया, चीन, फिलिपईन्स, युक्रेन व अन्य देशातून MBBS किंवा समकक्ष पदवी घेऊन भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा अनिवार्य आहे. वर्षातून दोनदा ती घेतल्या जाते. विदेशी वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा भारतीय मानकनुसार आहे अथवा नाही हे तपासण्याचा उद्देश या चाचणी परीक्षेमागे असतो. ती उत्तीर्ण झाल्यावर या पदवीधरास वैद्यकीय परिषदेत नोंदणी मिळते. ही अशी नोंदणी झाली असेल तरच भारतात रुग्णालयात काम करण्याची किंवा स्वतः प्रॅक्टिस करण्याची कायदेशीर परवानगी मिळते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close