क्राइम

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीने केली पार्टनर ची हत्या

Spread the love
भयाण शांततेत तरुणीचा आवाज माझ्या पार्टनरला वाचवा
कोलकाता / क्राईम रिपोर्टर
रात्री दीड ची वेळ काही लोकं गाढ झोपेत होते तर काही अर्धवट झोपलेले. मधात काही आवाज येत होता तो कुत्र्यांच्या भुंकण्याचा आणि रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या इंजिनाचा आणि हॉर्न चा. या भयाण शांततेत एका तरुणीच्या ओरडण्याचा आवाज येतो.ती घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर येते आणि जोरजोराने ओरडते की माझ्या पार्टनरला वाचवा.  तरुणीच्या मानेवर ओरखडल होत. काहीतरी अघटीत घडलं याचा जमलेल्या लोकांना अंदाज आला.  लोकांनी तरुणीचा आवाज ऐकून तिच्या घराकडे धाव घेतली. घरात प्रवेश करताच त्यांनी एका तरुणाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघितले. आणि काहींनी लगेच पोलिसांना कॉल केला.
घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली.  कोलकाता शहराच्या फर्तबाद भागात पोहचले. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत सार्थक आपली प्रेयसी संचलिका आणि तिची आई मौमिता यांच्यासमवेत राहत होता. २५ वर्षीय सार्थक हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो सॉल्ट लेकच्या सेक्टर ५ मधील एका नामांकित कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा सार्थक आणि त्याची प्रेयसी संचलिका यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून तीव्र स्वरूपाची वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या संचलिकाने घरातील धारदार शस्त्राने सार्थकच्या खांद्यावर प्राणघातक वार केला. या हल्ल्यात सार्थक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेनंतर गंभीर जखमी सार्थकला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.शेजाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी बनाव

हत्येची ही घटना लपवण्यासाठी आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी तरुणीने मोठा बनाव रचला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास संचलिका रडत-रडत फ्लॅटमधून बाहेर आली आणि माझ्या प्रियकरावर कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने हल्ला केला. त्याला तातडीच्या मदतीची गरज आहे, असा कांगावा तिने केला. तिच्या अंगावर आणि मानेवर काही ओरखड्यांच्या खुणाही दिसून आल्या. तिचा टाहो ऐकून आजूबाजूचे शेजारी मदतीसाठी धावले. त्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता सार्थक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

स्थानिक रहिवासी सायन पाल यांनी सांगितले की, “मध्यरात्री आम्हाला एका महिलेचा रडण्याचा आणि मदतीसाठी हाक मारण्याचा आवाज आला. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तरुण रक्ताने माखलेला होता. मात्र, संशयास्पद हालचालींमुळे आम्हाला लगेच काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला आणि आम्ही तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.”प्रेयसीसह आईला अटक; पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रं वेगानं फिरवली. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि शेजाऱ्यांच्या साक्षीच्या आधारे तपास केला असता, बाहेरची कोणतीही व्यक्ती घरात शिरल्याचं निष्पन्न झाले नाही. उलट, दोन दिवसांआधीच्या वादाच्या मुद्यावरून प्रेयसी संचलिका हिनेच हा जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आलं.

या खून प्रकरणात संचलिकाची आई मौमिता हिची देखील संशयास्पद भूमिका समोर आली असून पोलीस तिचा सहभाग किती होता, याचा सखोल तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसी संचलिका आणि तिची आई मौमिता या दोघींनाही अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणाला तरुणीने अशाप्रकारे संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close