चुकूनही व्हॉट्सॲप वर लिहू नका ‘ NO ‘ शब्द नाहीतर बँक खाते रिकामे झाले समजा

मोबाईल च्या वापरामुळे डिजिटल व्यवहार सोयीचे झाले आहे. अनेक व्यवहार आता ऑनलाइन व्हायला लागले आहेत. पण ज्या प्रमाणे फायद्याच्या मागे नुकसान दडलेले असते तसेच आता डिजिटल व्यवहारामुळे झाले आहे. ऑनलाइन व्यवहारामुळे फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे. आता तर नवीन स्कॅम समोर आला आहे.तुम्ही व्हॉट्सॲप वर साधा ‘ NO ‘ शब्द जरी लिहिला तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. असा प्रकार उघडकीस आल्याने एकच व्हॉट्सॲप वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तेलंगणाच्या पोलिसांनी व्हाट्सअॅप युजर्सना सावध केलं आहे. या स्कॅमने एका युजर्सची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकारानंतर तेलंगणामधील हैदराबाद पोलीस आयुक्तांनी युजर्सना घोटाळ्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
हैदराबादच्या पोलिसांच्या माहितीनुसार, स्कॅम करणारे नव्या माध्यमातून लोकांना टार्गेट करत आहेत. हैदराबाद शहर आयुक्त वीसी सज्जानार यांनी युजर्सना ओटीपी कोणालाही शेअर न करण्याचा सूचना केल्या आहेत. तुम्ही ओटीपी शेअर केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या एका चुकीने तुमची संपूर्ण कमाई गमावू शकता. स्कॅम करणाऱ्या लोकांचा आंतरराष्ट्रीय किंवा अनोळखी क्रमाकांवरून मेसेज येतो. या मेसेजला प्रत्युत्तर दिल्यास मालवेयर अॅक्टिव्हेट होतो. यानंतर फोनमधून वैयक्तिक माहिती चोरली जाते. या माध्यमातून तुमचे बँक खाते रिकामे करण्यात येऊ शकते. त्यामुळे स्कॅम करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करू नये अन्यथा तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही व्हाट्सअॅवर फक्त नो असा रिप्लाय केला, तर खात्यातून पैसे कापल्याचा मेसेज येतो. तुम्ही एटीएम किंवा बँकेतून पैसे न काढताही असा मेसेज येऊ शकतो. तुम्ही मोबाईलवर नो रिप्लाय केला, तर तुमच्या व्हॉट्सअॅपचा अॅक्सेस हॅकर्सला जातो.
नुकसान कसं टाळणार?
स्कॅम टाळायचा असल्यास आंतरराष्ट्रीय किंवा अनोळखी क्रमांकाच्या मेसेजला उत्तर देऊ नका. तुम्हाला घोटाळा होण्याची शक्यता वाटत असेल, तर तुम्ही तातडीने 1930 या क्रमाकांवर कॉल करू शकता. या क्रमाकांवरच तक्रार नोंदवावी. तुम्ही संचार साथी या अॅपवरूनही तक्रार करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही मोबाईलमध्ये अँटी व्हायरस इन्स्टॉल करावा. जेणेकरून वायरस किंवा मालवेयर ब्लॉक करण्याचे काम केलं जाईल. यामुळे फोनचा अॅक्सेस ब्लॉक होईल. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान टळेल.




