अपघात
३०५ प्रवाशी असलेली बोट उलटून १३९ लोकांचा मृत्यू, मृताकांत १५ लहान मुलांचा समावेश


पुर्व आफ्रिकेतील जिबूतीच्या किनाऱ्यावर प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची घटना घडलीये. या बोटीमध्ये एकूण ३०५ प्रवासी होते. यापैकी किमान १३९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दुर्देवाची बाब म्हणजे मृतांमध्ये १५ लहान मुलांचाही समावेश आहे.
तर ८४ जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत ८० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे.
इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) या आंतरराष्ट्रीय संस्थेने रविवारी याबाबत माहिती दिली. ही बोट जिबूतीहून येमेनच्या दिशेने जात होती. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
३०५ प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली
जिबूतीच्या किनाऱ्याजवळ झालेल्या या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालीये. बोटीतून प्रवास करणाऱ्या ३०५ जणांपैकी किमान १३९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १५ मुलांचा समावेश आहे. ८० हून अधिक प्रवाशांना वाचवण्यात यश आलं असलं तरी ८४ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही. बचाव पथकांकडून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळालीये.
जिबूतीमार्गे येमेनला जात होते प्रवासी
आफ्रिकेतील अनेक प्रवासी चांगल्या रोजगाराच्या आणि सुरक्षित जीवनाच्या शोधात जिबूतीमार्गे येमेनकडे जातात. त्यानंतर बाब-अल-मंदेब या समुद्रातील अरुंद मार्गातून प्रवास करून आखाती देशांमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
येमेनमध्ये हिंसाचार सुरू असतानाही प्रवाशांची ही ये-जा थांबलेली नाही. जिबूतीमधील IOM चे प्रमुख अलेक्झांडर कोयसॅक यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. ही घटना म्हणजे मोठी जीवितहानी असल्याचं त्यांनी म्हटलंय. रोजगाराच्या आणि आर्थिक संधींच्या शोधात या मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांना किती मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागतो याची जाणीव या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा झाली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



