क्राइम

अमली पदार्था विरोधात मोहीम चालविणाऱ्या झोटा यांची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

चंदीगड / विशेष प्रतिनिधी

                        अमली पदार्थ विरोधी मोहीम राबविणाऱ्या परविंदरसिंग  झोटी यांचा मेडिकल स्टोअर संचालकासोबत कथित रित्या झालेल्या वादात त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील माणसा परिसरात ही घटना घडली आहे.

‘फोर्स’ नावाची संघटना चालवणाऱ्या झोटा यांना जवळून अनेक गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या गोळ्या त्यांच्या शरीरातून आरपार गेल्याची माहिती आहे.

झोटा हे या परिसरात दीर्घकाळापासून अमली पदार्थांविरोधातील मोहिमेचे नेतृत्व करत होते. अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जनजागृती करण्यासोबतच ते अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी सक्रियपणे काम करत होते. या व्यवसायात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींना ते जाब विचारत असत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांशी त्यांचे अनेकदा संघर्ष झाले होते.

या मोहिमेच्या माध्यमातून झोटा यांनी अनेक गावांतील ग्रामपंचायतींनाही अमली पदार्थांच्या वापराविरोधात अधिकृत ठराव मंजूर करण्यासाठी प्रोत्साहित केले होते.

झोटा यांच्यावर गोळ्या झाडल्याचा कथित व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेतील कथित हल्लेखोर हा मेडिकल स्टोअरचा मालक असल्याचे वृत्त आहे. अमली पदार्थांच्या कथित बेकायदेशीर विक्रीवरून झोटा आणि मेडिकल स्टोअरच्या मालकामध्ये वाद झाल्याची माहिती आहे.

व्हिडीओमध्ये झोटा संबंधित दुकानाच्या मालकाला, मार मुझे, मार मुझे (मला मार, मला मार). तुझ्याकडे पिस्तूल का ठेवले आहेस? असे वारंवार सांगताना दिसत असल्याचे वृत्त आहे.

मानसा येथे झोटा यांच्या मृत्यूनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

भाजप आणि अकाली दलाकडून हत्येचा निषेध

भाजप नेते परमिंदर सिंग ब्रार यांनी झोटा यांच्या हत्येचा निषेध केला. पंजाबमधील तरुणांना अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी झोटा लढा देत होते, असे त्यांनी म्हटले.

परमिंदर झोटा… एक सिंह, एक पंजाबी, जो पंजाबच्या तरुणांना अमली पदार्थांच्या दलदलीतून वाचवण्यासाठी लढत होता. अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात त्यांचा आवाज घुमत होता. आज त्यांच्या हत्येची बातमी समोर आल्यानंतर अमली पदार्थांविरोधात लढण्याचे धैर्य असलेल्या पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. अमली पदार्थांविरोधात आवाज उठवणारेच सुरक्षित नसतील, तर पंजाबच्या तरुणांनी कोणावर विश्वास ठेवायचा? मान साहेब, तुमची लाज वाटली पाहिजे! बदल घडवून आणण्याच्या आशेने पंजाबच्या जनतेने तुम्हाला निवडून दिले होते. आज जनता उत्तर मागत आहे. पंजाबच्या मुलांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? असे ब्रार यांनी म्हटले.

दरम्यान शिरोमणी अकाली दलानेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत या हत्येचा निषेध केला.

अमली पदार्थांच्या विक्रेत्याने परविंदर सिंग झोटा यांची निर्घृण हत्या केल्याबद्दल शिरोमणी अकाली दल तीव्र चिंता व्यक्त करत आहे. हा भयानक गुन्हा पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे पुन्हा एकदा उघड करतो. या कठीण प्रसंगी आम्ही मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांसोबत ठामपणे उभे आहोत,असे अकाली दलाने म्हटले.

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारवर टीका करताना पक्षाने पुढे म्हटले, पंजाबविरोधी भगवंत मान सरकारने अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना आणि गुन्हेगारांना मोकळे रान दिले आहे. त्यामुळे राज्य असुरक्षित झाले आहे. हे सरकार घोटाळ्यांमध्ये पूर्णपणे बुडाले असून पंजाबी लोक रस्त्यावर रक्तबंबाळ होत असताना स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त आहे. हा कारभार नाही तर गैरकारभार आणि अराजकता आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close