क्राइम

सुप्रीम कोर्टाचे बनावट आदेश तयार करून कैद्याची सुटका

Spread the love
 

कैद्याच्या पत्नीसोबत सबंध ठेवणाऱ्या कारागृह उपमहानिरीक्षक यांना अटक 

बगळूरु /विशेष प्रतिनिधी 

खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शंकर नावाच्या कैद्याची सर्वोच्च न्यायालयाचा बनावट आदेश तयार करून सुटका केल्याप्रकरणी परप्पन अग्रहार कारागृहाचे उपमहानिरीक्षक सोमशेखर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील बनावट कागदपत्र तत्कालीन कारागृहातील कनिष्ठ विभाग सहायक (एसडीए) श्रीकांत एस. याने तयार केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर कैद्याची सुटका करण्यासाठी त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी कैदी शंकर आणि बनावट आदेश तयार केल्याचा आरोप असलेल्या श्रीकांतला पोलिसांनी अटक केली होती. शंकर याला २००१ मध्ये खून, अपहरण आणि खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. न्यायालयीन सुनावणीनंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दरम्यान, २०१८ मध्ये त्याच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात फौजदारी अपील दाखल करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. या अपिलाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिल्याचे भासवणारा बनावट आदेश कारागृह प्रशासनाला सादर करण्यात आला. त्यानंतर शंकरची कारागृहातून सुटका करण्यात आली. बनावट आदेशाच्या आधारे झालेल्या या सुटकेप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून, कारागृह अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे.

नवऱ्याच्या सुटकेसाठी पत्नीचं लैंगिक शोषण

 

बंगळुरू मध्यवर्ती कारागृहाच्या माजी मुख्य अधीक्षक सोमशेखर यावर जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये नवऱ्याची तुरुंगातून सुटका करण्याच्या मोबदल्यात तुरुंग अधिकाऱ्याने लैंगिक शोषण केलं असा आरोप करण्यात आला आहे. यानंतर सोमशेखर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. सध्या पुढील चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बनावट आदेश कसा काढला?

जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी कारागृहातून कसा बाहेर आला, याचा तपास पोलीस करत असताना, पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाने बाहेर आल्याचे समजले. या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असताना सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बनावट असल्याचे निदर्शनास आले. सध्या सुप्रीम कोर्टाचा बनावट आदेश कसा काढला, याचा अधिक तपस पोलीस करत असल्याची माहिती समोर आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close