क्राइम
मैत्रीण 13 वर्षीय मुलीला घेऊन गेली स्वच्छतागृहात,दोघांनी तोडले अब्रूचे लचके


मैत्रिणीने तिला महिला स्वच्छतागृहात नेले तेथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी केला आळीपाळीने बलात्कार
चाळीसगाव / विशेष प्रतिनिधी
चाळीसगाव शहरालगत एक संतापजनक घटना घडली आहे. पीडित 13 वर्षीय अल्पवयीन मुलीची आई घरी पाणी आणायला गेल्याची संधी साधत मैत्रीण तिला स्वच्छतागृहात घेऊन गेली. त्या ठिकाणी असलेल्या दोन तरुणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. राहुल आणि आर्या अशी त्या दोन नराधमांची नावे आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.तर त्यांना मदत करणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दोन्ही तरुणांकडून आळीपाळीने अत्याचार
यावेळी पीडित मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र, 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने तिचे तोंड दाबून हात पकडले. त्यानंतर आर्या यानेही पीडितेवर अत्याचार केला. दोन्ही तरुणांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर राहुल याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी
अत्याचारानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी आर्या याने पीडितेला दिली. तसेच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनेही आपले नाव कोणाला सांगितल्यास पीडितेला सोडणार नसल्याची धमकी दिली. या प्रकरणी चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(i), 64(2)(m), 65(1), 70(2), 351(2), 49, 3(5) तसेच POCSO कायद्याच्या कलम 4, 6, 8, 10, 12 आणि 17 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मध्य प्रदेशातील दोन्ही आरोपी तरुणांना तात्काळ अटक केली आहे. तर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीबाबत कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!



