क्राइम

सियाच्या बाबतीत आणखी एक धक्कादायक खुलासा, ती लग्न होणार नसल्याचे होती सांगत 

Spread the love

नाशिक / विशेष प्रतिनिधी

केतन अग्रवाल हत्याकांडाने देशाला हादरवून सोडले आहे. उद्योगपती घराण्यातील मुलगा आणि मुलगी यांचे लग्न जुळल्यानंतर दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना, लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या केतन चा वागदत्त  वधू  सिया गोयल हिने आपल्या मित्राच्या मदतीने केतन चा गडावरून ढकलून खून केला.या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याविरोधात तपास सुरू असतानाच आता सियावर आणखी काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सियाच्या वर्तनाबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत.

संगीता तिवारी यांनी आरोप केला की, केतन अग्रवालचा खून हा पूर्णपणे पूर्वनियोजित आणि थंड डोक्याने रचलेला कट होता. या प्रकरणात सिया गोयलला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Siya Goyal)

तिवारी यांच्या दाव्यानुसार, सियाने लग्न होणार नसल्याचे आधीपासूनच आपल्या मैत्रिणींना सांगितले होते. तसेच प्रवासासाठी तिकीट बुक करण्याच्या निमित्ताने तिने एका मैत्रिणीकडे आधार कार्डही मागितल्याचा दावा त्यांनी केला. यासंदर्भातील १४ मे रोजीचे कथित चॅटही त्यांनी माध्यमांसमोर सादर केल्याचे सांगितले.

याशिवाय, संगीता तिवारी यांनी सियावर आणखी गंभीर आरोप करत दावा केला की, ती अनेकदा आपल्या मैत्रिणींच्या बॉयफ्रेंडसोबत लॉजवर जात होती. तिच्या अशा वर्तनाचे काही व्हिडिओ आपल्या ताब्यात असल्याचाही दावा त्यांनी केला. तसेच केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलिस कोठडी आज संपत असून, दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी दोघांकडून लोहगड किल्ल्यावर घटनाक्रमाचे पुनर्निर्माण (सीन रिक्रिएशन) करून घेतले असून, विविध ठिकाणी तपासही केला आहे. आता न्यायालयात पोलीस कोणते नवे पुरावे सादर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close