क्राइम

भवानी च्या मंदिरातील लग्नाची रिल मावशीने पाहिली अन्…..

Spread the love
बंगळुरू / विशेष प्रतिनिधी
           येथील तुळशी नगरात वास्तव्यास असलेली भवानी मोबाईल दुकानात काम करायची . ती दुकाना पर्यंत ज्या ऑटो ने जायची त्या ऑटो चालक चंदन सोबत तिचे सुत जुळले.ती प्रेमात असल्याचे तिने कुटुंबियांना सांगितले होते. दरम्यान भवानी च्या कुटुंबियांनी तिच्या साठी स्थळ पाहणे सुरू केले होते. मुलगा पसंद आल्याने आणि भवानी चा देखील होकार असल्याने लग्न ठरले. ही बाब चंदन ला समजताच त्याने भवानीच्या घरी जाऊन तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
               त्यानंतर त्याने तिच्यावर दबाब टाकला.पण तिने कुटुंबियांच्या मर्जीनुसार लग्न करणार अस ठणकावून सांगितलं. चंदन आणि भवानी यांनी मंदिरात गुपचुप लग्न केले होते. पण ही बाब त्यांनी कुटुंबियापासून लपवून ठेवली होती. आणि ते वेगवेगळे रहायचे.
चंदन आपल्याला धमकावत असल्याचं भवानीनं तिच्या आई, वडिलांना सांगितलं होतं, अशी माहिती पोलिसांना दिली. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, चंदन १३ जूनला भवानीच्या घरी गेला होता. कुटुंबानं आणलेल्या स्थळाला नाही म्हण आणि लग्नाला नकार दे, असं म्हणत चंदननं भवानीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिनं नकार दिला. यानंतर चंदननं विषय आणलं. आपण दोघे विष प्राशन करू, असं त्यानं सांगितलं.
भवानीनं विष घेण्यास नकार देताच चंदननं तिला जबरदस्तीनं विष पाजलं. त्यानंतर गळा दाबून तिला संपवलं. यानंतर चंदन स्वत:ही थोडं विष प्यायला. त्यानं थोडंसं विष स्वत:च्याही कपड्यांवर सांडलं आणि आत्महत्येचा देखावा उभा केला
चंदननं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मंदिरात झालेल्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानं हे प्रकरण उजेडात आलं. भवानीच्या मावशीनं इन्स्टा स्टोरी पाहिली. तिनं भवानीला ओळखलं आणि भवानीचे वडील श्रीनिवास यांना तातडीनं माहिती दिली. श्रीनिवास यांनी लेकीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण उत्तर मिळालं नाही. मग त्यांनी घर मालकाला सूचना दिली. घर आतून बंद असल्याचं मालकांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
पोलिसांनी दार उघडलं तेव्हा भवानी आतमध्ये मृतावस्थेत आढळली. तर चंदन बेशुद्धावस्थेत सापडला. पोलिसांनी चंदनची चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. चंदन आधीपासूनच विवाहित असून त्याला एक मूल असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close