क्राइम

तो बालक बिबट्याचा बळी नव्हे तर त्याची हत्या, आरोपीला अटक

Spread the love
लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून ही हत्या झाल्याचे तपासात उघड 
शिरूर ( पुणे) / विशेष प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरेवस्ती येथे 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. कदाचित बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यू झाला असावा असे वाटत होते. पण त्याचा खून  झाल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे. घटना मंगळवारी घडली होती. साईराज गणेश मांजरे असं खून झालेल्या बालकाचं नाव होतं. या घटनेनंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाल्याचं समोर आलं.  ही हत्या असल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर आता 24 तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत अक्षय मांजरे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

आरोपीने गुन्हा कबूल केला

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहिवडी गावात एका निष्पाप मुलाचा बळी घेण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण होते. मात्र, आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्याने पोलिसांचं कौतुक केलं जातंय. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून ही हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणात एक नवा खुलासा समोर येत आहे. याच गावात 21 महिन्यांपूर्वी एका 10 वर्षांच्या मुलाची अशाच प्रकारे हत्या झाली होती. दोन्ही घटनांमधील साम्य पाहता, आरोपी अक्षय मांजरे यानेच ती हत्या केली असावी का, यादृष्टीने पोलीस आता सखोल तपास करत आहेत. या प्रकरणातील तपासा नंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, पीडित मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे. आता 21 महिन्यापूर्वी याच गावात झालेली दहा वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या याच आरोपीने केली असल्याची प्राथमीक माहिती समोर येत असून त्या अनुशंगाने शिक्रापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close