क्राइम

कॅफे मध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार  दोन महिलेसह तिघांना अटक; तीन आरोपी फरार

Spread the love
 

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी 

 दिल्लीतील प्रीत विहार परिसरातील एका कॅफेमध्ये रात्री उशिरा झालेल्या पार्टीनंतर दोन पुरुष सहकाऱ्यांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप २२ वर्षीय तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह एकूण तिघा जणांना अटक केली आहे, तर इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे सर्वजण कडकडडूमा येथील ‘क्रॉस रिव्हर मॉल’मधील ‘कॅफे ८’मध्ये एकत्र काम करत होते.

आठ जणांची कॅफेत पार्टी

सोमवारी रात्री, पीडित तरुणीसह आठ जण प्रीत विहारमधील ‘सल्तनत कॅफे’ येथे पार्टीसाठी एकत्र आले होते. हा कॅफे सहसा रात्री ११:३० वाजता बंद होतो, परंतु एका कर्मचाऱ्याकडे चाव्या असल्याने, पार्टी सुरु ठेवण्यासाठी त्यांनी रात्री उशिरा पुन्हा कॅफे उघडला.

मद्यपानानंतर दोघांनी अत्याचार केल्याचा आरोप

या ग्रुपने मद्यपान केले आणि पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास सर्वजण तेथून बाहेर पडले. त्यानंतर दोघा पुरुषांनी आपल्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे; तिने असाही आरोप केला की, त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना यात साथ दिली.

सहा जणांवर गुन्हा, तिघांना अटक

पोलिसांनी चार पुरुष आणि दोन महिला अशा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close