आध्यात्मिक

जम्मा जागरण मध्ये आ.सुमित वानखेडे यांची उपस्थिती

Spread the love
आर्वी / मलिक पटेल
राजस्थान मधील सुप्रसिद्ध संत बाबा रामदेवजी ज्यांना भक्त परिवार रामापीर म्हणून सुद्धा ओळखतात त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्री रामदेव बाबा उत्सव समिती, गणपती वार्ड, आर्वी द्वारा “जम्मा जागरण भजनसंध्या” या कार्यक्रमाचे आयोजन करूयात आले होते.
गायक महेंद्रसिंग राठोड यांनी सादर केलेल्या गगनभेदी व सुरेल भजनांच्या सुरावटींनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यांच्या प्रत्येक ओव्या-प्रत्येक स्वरातून श्रद्धा आणि अध्यात्माची अनुभूती सर्वांना मिळाली.
श्री रामदेव बाबा उत्सव समिती, गणपती वार्ड, आर्वी (जि. वर्धा) तसेच शहरातील भाविक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग देऊन या दिव्य सोहळ्याला अधिकच मंगलमय बनविले.
        या कार्यक्रमाला आत.सुमित वानखेडे आणि इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.
या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मिळालेली आध्यात्मिक ऊर्जा, एकात्मतेचा संदेश आणि बाबा रामदेवजींचा आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवन सदैव प्रकाशित राहो, हीच प्रार्थना.
         आ.सुमित वानखेडे
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close