क्राइम

कृरतेचा कळस ; सहा वर्षाच्या मुलाच्या डोक्यात खीळ ठोकून केली हत्या

Spread the love

दोन कुटुंबात जमिनीवरून सुरू होता वाद 

बेगुसराय (बिहार ) / नवप्रहार ब्युरो 

 

         बिहार मध्ये घडणाऱ्या घटना बघून कधी कधी असे वाटायला लागते की देवाने येथील लोकांना काळीज दिले की नाही ? येथील लोकांना प्रेम हा शब्द माहित आहे की नाही. कारण बिहार राज्यात क्राईम चा रेट इतर राज्यांच्या तुलनेत जरा जास्तच आहे. बरे येथील लोकांना काळीज नाही असे म्हटले तर येथून प्रेमप्रकरणाच्या घटना देखील समोर येतात. बरे असो .. बिहार मध्ये हृदयाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे जमिनीच्या वादातून सहा वर्षाच्या मुलाची डोक्यात खीळ ठोकून हत्या करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे.

मुलगा बिस्किट आणण्यासाठी गेलेला दुकानात

बेगुसरायच्या रिफायनरी पोलीस स्टेशन परिसरातील चकबल्ली गावातील वॉर्ड क्रमांक १४ मध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गोलू घरातून १० रुपये घेऊन जवळच्या दुकानातून बिस्किट खरेदी करण्यासाठी गेला होता. शेजारी राहणाऱ्या बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबीयांनी त्याची धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी चकबल्ली गावाचा रस्ता रोखून गोंधळ घातला.

जमिनीवरून सुरू होता वाद

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबासोबत जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू आहे. आरोपी अनेकदा तुमच्या मुलाला मारून टाकेन अशी धमकी देत ​​असत.

“हे बघ, तुझा मुलगा मेला”

मुलाीची आई रिंकू देवी यांनी आरोप केला आहे की, गोलू घरातून पैसे घेऊन बाहेर गेला होता. बिस्किट खरेदी करण्यासाठी १० रुपये नेले होते. थोड्या वेळाने, बाळकृष्ण सिंहच्या कुटुंबातील एक महिला गोलूचा मृतदेह घेऊन आली आणि हे बघ, तुझा मुलगा मेला असं म्हणाली. आरोपीने गोलूच्या डोक्यात खिळा ठोकून त्याची हत्या केली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close