विदेश

अन् ब्रिटन्स गॉट टॅलेंट चे परीक्षक झाले भारतीय वंशाच्या 8 वर्षीय मुलीचे मुरीद

Spread the love

ब्रिटन /नवप्रहार ब्युरो

                भारतात अनेक टेलेंटेड लोक आहेत.हे लोकं विदेशात जाऊन आपल्या देशाचे नावलौकिक करतात. मूळची आसाम येथील रहिवासी असलेल्या एका 8 वर्षाच्या मुलीने ब्रिटन मध्ये असा तहलका माचवला की तिथले प्रेक्षक तर सोडा परीक्षक देखील तिचे दिवाणे झाले आहेत. प्रेक्षकांनी तिच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे. इतकेच काय तर भारतातील उद्योजक आनंद महिंद्रा देखील तिचे फॅन झाले आहेत.

‘ब्रिटन्स गॉट टॅलेंट’मध्ये  मुलीने हजेरी लावली होती.यावेळी तिचा डान्स पाहून फक्त प्रेक्षकच नाही तर परीक्षकही अवाक झाले होते. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मुलगी स्टेजवर स्वत:ची ओळख करुन देताना बिनिता छेत्री नाव सांगते. तसंच जर आपण ही स्पर्धा जिंकलो तर ‘पिंक प्रिन्सेस हाऊस’ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करते.

“माझं नाव बिनिता छेत्री असून, मी आठ वर्षांची आहे. मी भारतातील आसाम येथून आली आहे. ब्रिटन्स गॉट टॅलेंट माझं ड्रीम स्टेज असून, मला जिंकायचं आहे. मला पिंक प्रिन्सेस हाऊस खरेदी करायचं आहे,” असं मुलगी स्टेजवर आल्यानंतर परीक्षकांना सांगते.

यानंतर मुलगी जेव्हा डान्स सुरु करते तेव्हा तिच्या चित्तथरारक बॅकफ्लिप्स, लवचिकता आणि चपळता पाहून परीक्षक आणि प्रेक्षक आनंदित होतात. तिचा परफॉमन्स पाहून सर्वजण उभं राहून तिचं कौतुक करतात.

“तुझ्यात वाघाची ताकद आहे आणि स्टेजवर अजगरासारखी हालचाल आहे. मला समकालीन नृत्य आणि भारतीय स्पर्शांचे मिश्रण आवडते. इतके मजबूत, इतके कमी, इतके शक्तिशाली. अद्भुत कामगिरी. जबरदस्त,” अशा शब्दांत परीक्षक तिचं कौतुक करतात. तसंच पुढील फेरीसाठी पात्र ठरल्याचं जाहीर करतात.

महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रादेखील बिनिताची कामगिरी पाहून अवाक झाले आहेत. ती आपली मंडे मोटिव्हेशन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही एक्सवर बिनिताचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच तिला यश मिळावं यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. “माझ्या चिमुरडीला शुभेच्छा, ती पिंक प्रिन्सेस हाऊस खरेदी करण्यात यशस्वी व्हावी अशी आशा,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close