हटके

चिप्स खाल्ल्याने विद्यार्थिनींचा मृत्यू ? 

Spread the love

चिप्स खाल्ल्याने विद्यार्थिनींचा मृत्यू ?

जमशेदपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क

                             चिप्स हा आबालवयुद्धांच्या आवडीचा पदार्थ . लहान मुलांना तर चिप्स चा भयंकर मोह असतो. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून भातकयसाठी पैशे मिळाले की स्वारी सरळ किराणा दुकान गाठते आणि चिप्स चे पॅकेट घेऊन  येते . पण हेच चिप्स खाल्याने जीव गेला असे म्हटले तर कोणाला यावर विश्वास बसणार नाही. पण जमशेदपूर च्या एका शाळेत आहि घटना घडली आहे. चिप्स खाल्ल्यानंतर एका 9 व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच आता खरं काय ते कळणार आहे.

येथील 9वीत शिकणाऱ्या मुलीचा शाळेतच मृत्यू झाल्याने गोंधळ उडाला. चिप्स खाल्ल्यानंतर मुलीची प्रकृती अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध होऊन शाळेच्या आवारात पडली. ही घटना सीतारामडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी हायस्कूलशी संबंधित आहे.

रितिका त्रिवेदी असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती नववीत शिकत होती. ती रोज सारखी शाळेत पोहोचली होती. शाळेत दुपारचे जेवण झाल्यावर तिने घरून आणलेले जेवण खाल्ले होते. यानंतर तिने चिप्स खाल्ले, त्यानंतर तिची तब्येत बिघडली आणि ती बेशुद्ध झाली आणि शाळेच्या कॅम्पसमध्येच जमिनीवर पडली. यानंतर शाळा व्यवस्थापनात गोंधळ उडाला.

घाईघाईत बेशुद्ध झालेल्या विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाला या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close