दोन महिलांच्या भांडणात नवऱ्याने काढला चाकु आणि केला वार महिला ठार

नंदुरबार / विशेष प्रतिनिधी
दोन महिलांच्या भांडणात पडलेल्या एकीच्या नवऱ्याने दुसऱ्या महिलेवर चाकूने वार केल्याने महिलेचा मृत्यूं झाला आहे. यामुळे संतापलेल्या आदिवासी समाजाने बंद ची हाक दिली आहे. ही धक्कादायक घटना नंदुरबारच्या मलोणी परिसरात घडली असून, या भांडणात दिपाली चित्ते यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी आरोपी महिला आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेनंतर नंदुरबारमधील शहादा येथे आक्रमक आदिवासी समाजानं बंदची हाक दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबरला रात्री ८ च्या सुमारास नंदुरबारच्या मलोणी परीसरात दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. दिपाली सागर चित्ते आणि रिज्जु मुस्लीम कुरेशी या दोन्ही महिलांमध्ये टोकाचे भांडण झाले. भांडणानंतर दिपाली आणि तिचे नातेवाईक रिज्जूच्या घरी गेले. दोन्ही गटात पुन्हा वाद झाला. रिज्जूच्या पतीला राग अनावर झाला आणि त्यानं चाकू काढत दिपालीवर वार करत हत्या केलं आहे.
ही धक्कादायक घटनेनंतर दिपालीला तातडीनं उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु दुसर्या दिवशी तिची प्रकृती बिघडल्यानं तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, ३ डिसेंबरलाच सुरत येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणानंतर मुस्लिम हमीद कुरेशी आणि रिज्जु मुस्लीम कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिपालीती परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला सुरतच्या खासगी रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्ह्यात वाढीव कलम दाखल केला. हत्येचा प्रयत्न करून जबर दुखापत केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत, ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तरुणीच्या मृत्युनंतर जिल्ह्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. या प्रकरणानंतर आक्रमक आदिवासी समाजाने शहादा बंदची हाक दिली आहे.




