सामाजिक

प्रेअर वॉरियर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर, यांच्यातर्फे ख्रिस्तजन्मोत्सव निमित्त गरजू मातांना साड्यांचे वाटप

Spread the love
नगर-  प्रेअर वॉरियर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर, यांच्यातर्फे “ख्रिस्तजन्मोत्सव सणानिमित्त  शांतीपूर तारकपूर येथे गरजूं माता बहीनीं करिता उत्कृष्ट प्रतीच्या साड्यांचे वाटप करण्यात आले.  त्याच बरोबर सर्वांकरिता प्रीती भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सर्व लहान थोरांनी या ख्रिस्त जयंती सोहळ्याचा आनंद लुटला.
            यावेळी  ब्र.दिलीप सातपुते, यांनी सुरुवातीची प्रार्थना केली व सन्माननीय. रेव्ह.विजय काकडे पाळकसाहेब, यांनी वाचनातून उत्कृष्ट मार्गदर्शन केले. तसेच शेवटची प्रार्थना सन्माननीय. रेव्ह.संजय मिसाळ पाळकसाहेब, यांनी केली व शेवटचा आशीर्वाद रेव्ह.प्रकाश बनसोडे पाळकसाहेब, यांनी दिला.
        त्याचप्रमाणे संस्थेच्या पुढील कारकीर्दी करता  रेव्ह.अशोक पठारे पाळकसाहेब, यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी सिस्टर.अलका पवार, ब्रदर.प्रियेश वाघमारे, ब्रदर.शाम वैरागर, ब्रदर.सुनील जाधव, ब्रदर.राहुल वडागळे, ब्रदर.विशाल शेलार, ब्रदर.बाळासाहेब वडागळे, ब्रदर.गौरव वैरागर, ब्रदर.स्वप्निल वैरागर, ब्रदर.रवी वैरागर, ब्रदर.सौरभ वैरागर, ब्रदर.किशोर वैरागर, ब्रदर.धिवर सर, प्राध्यापक.अंबादास उमाप सर, ब्रदर.बाबासाहेब उमाप, ब्रदर.संभाजी उमाप, ब्रदर शुभम वैरागर, ब्रदर.अशोक वैरागर, आदरणीय. बारसे मामा, ब्रदर. भाऊ भिंगारदिवे, त्याचप्रमाणे संस्थेच्या महिला ग्रुपच्या अध्यक्षा सिस्टर.बेबीताई भालेराव, सि.कविता जोसेफ वैरागर (पाळकीनबाई), व संस्थेच्या इतर सर्व महिला बहिणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
         या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ख्रिस्ती युथ ग्रुप सारसनगर अध्यक्ष.विजय अंधारे, साहेब त्याचप्रमाणे  सिस्टर.उषाताई उनवणे, सि.मोना क्षेत्रे , सि.मीनल क्षेत्रे , सि.प्रमोदिनी शिरसाठ, सि.सरला , डॉ.वाखुरे , सि.स्वप्निजा, सि.सविता जाधव, सि.ज्योती उमाप, सि.मनीषा उमाप, सि.रूपाली उमाप, सि.वंदना ससाणे, सि.संगीता काळे, सि.सुचेता काळे, सि.धिवर, सि.महिमा, सि.स्वप्ना सोनवणे, तसेच समाजातील अनेक मान्यवरांचे योगदान व उपस्थिती लाभली व अशा आनंदी वातावरणामध्ये ह्या आशीर्वादित कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
 शेवटी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक पास्टर जोसेफ वैरागर पाळकसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व मान्यवरांचे व उपस्थित माता-बहिणींचे आभार मानले.
       .
 प्रेअर वॉरियर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर, यांच्यातर्फे “ख्रिस्तजन्मोत्सव सणानिमित्त  शांतीपूर तारकपूर येथे गरजूं माता बहीनीं करिता उत्कृष्ट प्रतीच्या साड्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. (छाया: मुकुंद भट)
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close