राजकिय

भाजप च्या पहिल्याच यादीत  देवेंद्र फडणवीस आणि आ. प्रताप दादा यांचे नाव 

Spread the love
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                   भाजपा ने प्रसिद्ध केलेल्या पाहिल्याचं यादीत उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आ. प्रताप अडसड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
                  निवडणूक आयोगाने राज्यात निवडणुकीची घोषणा केल्यावर सगळेच पक्ष उमेदवाराच्या नावांची घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. पण महाविकास आघाडीत असलेल्या पक्षाचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांच्यात मतदार संघाला घेऊन एकमत होत नसल्याचे दिसुन येत आहे.
                 महायुतीत सुद्धा  उमेदवारी ला घेऊन काहीतरी घुसफूस सुरु असल्याची  चर्चा सुरु होती. परंतु महायुत
तीतील घटक पक्ष असलेल्या भाजपा ने ९९ उमेदवारांचा समावेश असलेली  आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात प्रामुख्याने उपमुखमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि धामणगाव रेल्वे ( अमरावती ) मतदार संघाचे आ. प्रताप अडसड यांचा समावेश आहे. त्यांना उमेदवारी दिल्या गेल्याने मतदार संघात मुख्यतः भाजपा कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close