क्राइम
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या युवकांवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
तालुक्यातील जळगाव आर्वी येथील काही युवक गणपती विसर्जनासाठी कौडण्यापूर ता. तिवसा येथे गेले असता काही युवकांनी यांच्याशी वाद घालुन त्यांच्यावर धारदार शस्त्राने आणि लाकडी टेम्प्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. याबाबत मनोज भास्कर काकडे यांनी कुऱ्हा पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपींवर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मजोज काकडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी गावातील गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कौडण्यापूर हेठे5 गेले असता तेथील काही युवकांनी त्यांना मूर्ती नदीत विसर्जन करण्यासाठी मज्जाव केला. पण या लोकांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत मूर्तीची पूजा सुरू ठेवली. आणि मूर्ती विसर्जन करण्याची तयारी करत असतांना आमच्या कडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शिवीगाळ करन्यास सुरवात केली. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत मूर्ती विसर्जन करत होतो. तेव्हा एकाने येऊन धीरज मुडे याची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी मधात जाऊन भांडण सोडवले.
दरम्यान त्यापैकी एकाने फोन करून आपल्या काही मित्रांना बोलावले. तेव्हा काही लोक हातात धारदार शस्त्र आणि लाकडी टेम्पे घेऊन आले आणि आम्हाला मारायला सुरुवात केली. आमच्या सोबत असलेल्या ऋषीकेश प्रवीण शेळके, धिरज प्रल्हाद मुळे, जगदिश रविन्द्र शेळके, प्रणय राजेन्द्र शेलके, मनोज भास्कर काकडे, सर्व रा. जळगाव आर्मी यांचे तर धारदार शस्वाने व लाकडी टेणप्याने डोक्यावर, खांदयावर पातीवर, पायावर, मानेवर मारहान केली त्यामुळे धिरंज मुळे जगदिश शेळके, ग्रांना जखम होवुन रक्त निघाले व त्यांना जास्त मार असुन ऋषीकेश शेळके याला डोक्याचे उजव्या कानाने वर गार असुन प्रणय झलके यांचे उजव्या हाताचे दंडावर व उजव्या हाताच्या करंगळीवर व डावया हाताच्या तिन्ही बोटानवर जखमा झाल्या आहे त्याचप्रमाणे मलाही डोक्याच्या मध्यभागी कपाळावर, डाव्या कानाच्या वरच्या बाजुला जखम झाली असुन रक्त निघत आहे व पाठीवर मुका मार लागला आहे. त्यांचे जवळ धारदार शस्त्राने व लाकडी टेणप्याने वार करत असल्याने आम्ही जिनाचे भितीने पळून आलो.
चिरंज मुळे, व जगदिश शेळके यांना जास्त गार असल्याने उपचाराकरिता प्राथानिक आरोग्य केन्द्र अंजनसिंगी येथे नेले.
कुऱ्हा पोलिसांनी पाच आरोपींना केली अटक – कुऱ्हा पोलिसांनी या प्रकरणात
केवलसिंग पटवा वय 21 रा. आर्वी , भ संग्रामसिंग बावरी वय 21 वर्ष रा।देउरवाडा , प्रणय बुलबुले 21 वर्ष .रा.आर्वी आदित्य डाखोडे वर्ष 19 वर्ष रा. देऊरवाडा हंसराज कठाणे 22 वर्ष रा. . कर्माबाद यांना अटक केली आहे. यांच्यावर भादवी कलम 189 (1)(2)(4), 191 (3), 190, 109 ,118 (1) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1