क्राइम

लग्नाचे आमिष देत शिक्षका कडून शिक्षिकेचे लैंगिक शोषण 

Spread the love

जळगाव / नवप्रहार डेस्क

                    ” तू मला आवडतेस ” मी तुझ्याशी लग्न करेल. असे बोलत शिक्षिकेशी जवळीक साधून तिचे वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षका विरोधात शिक्षिकेच्या तक्रारी नंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षेकेला लग्न करायचे असल्यास माझ्या लहान मुलासोबत कार असे म्हणणाऱ्या शिक्षकाच्या आई विरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशांत झाल्टे असे त्या अत्याचारी शिक्षकाचे नाव आहे.

त्यावरून शिक्षकाविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले.

एका शाळेत शिक्षिका असलेल्या एका महिलेसोबत प्रशांत झाल्टे याने सहानुभुती दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच तू मला आवडते असे सांगून तीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्याशी वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. शिक्षिकेने त्याला

लग्नाविषयी विचारले असता तो नकार देऊ लागला. त्यानंतर सदर शिक्षिका त्याच्या घरी गेली असता त्याने नकार कायम ठेवला. त्या वेळी त्याच्या आईने शिक्षिकेला सांगितले की, त्याचे लग्न झालेले आहे, तुला या घरात यायचे असल्यास त्याच्या लहान भावाशी लग्न करावे लागेल असे सांगितले, मात्र त्या महिलेने नकार दिला.

अखेर या प्रकरणी शिक्षिकेने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शिक्षक याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली आहे. शिक्षकाच्या आईविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close