Uncategorized

काही तासा अगोदर घेतल्या सात जन्माच्या आणाभाका अन् …… 

Spread the love

कोल्हार ( कर्नाटक ) / नवप्रहार डेस्क

                  लग्न म्हणजे सात जन्माचे बंधन असल्याचे म्हटल जाते. लग्नामुळे केवळ मुलगा आणि मुलगी एकत्र येत नाही तर दोन कुटुंब रेखील ऐकात्र येतात. लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही असे म्हटल्या जाते. पण लग्नाच्या काही तासा नंतरच नवऱ्यामुलाने बायकोची हत्या केल्याचा अविश्वसनीय प्रकार कर्नाटक राज्यात घडली आहे.

नवीन आणि लिखिता या दोघांचं लग्न झालं. त्यानंतर नवीन ने अवघ्या काही तासांमध्ये लिखिताची म्हणजेच त्याच्या पत्नीची हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधल्या कोल्हार या ठिकाणी असलेल्या चंबारसाबहाळ्ळी या गावात नवीन आणि लिखिता  यांचा विवाह सोहळा पार पडला. या गावातला लग्नाचा हॉल या दोघांनी सोडला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हे दोघंही गेले. त्यांच्याबरोबर इतर नातेवाईकही होते. लिखिताच्या मामाच्या घरी हे दोघं लग्नानंतर गेले. दोघंही तिथे फ्रेश झाले त्यानंतर गप्पा झाल्या आणि खाणंही झालं. हे सगळं झाल्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले. त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं होतं. काही मिनिटांनी त्यांच्या नातेवाईकांना ओरडण्याचा आवाज  आला. ज्यानंतर एका नातेवाईकाने खिडकीतून डोकावून पाहिलं तर नवीन हा लिखितावर चाकूने वार  करत होता.

ही घटना पाहिल्यानंतर लिखिताच्या नातेवाईकांनी खोलीचं दार ठोठावलं आणि ते उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्यात काही वेळ गेला. त्यानंतर त्यांनी कसाबसा दरवाजा उघडला. आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की लिखिता रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तर नवीनला काही जखमा झाल्या होत्या. कुटुंबियांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवली. या दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र लिखिताला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

नवीनच्या जबाबानंतर समोर येणार सत्य

नवीनवर पुढील उपचार सुरु आहेत. पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी हे पण सांगितलं की या दोघांमध्ये भांडण कशावरुन झालं त्याचा तपास आम्ही करत आहोत इतकंच नाही तर नवीनला तिथे चाकू कसा मिळाला? याचाही शोध आम्ही घेत आहोत. नवीनचा जबाब नोंदवल्यानंतरच नेमकं भांडण का झालं ते कळू शकेल. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. नवीन आणि लिखिता यांचं भांडण का झालं ? त्याचं कारण नवीनच्या कुटुंबाला किंवा लिखिताच्या कुटुंबाला माहीत नाही. नवीन कापड व्यापारी आहे तर लिखिताने नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि या दोघांच्या लग्नानंतर अवघ्या काही तासांत ही धक्कादायक घटना घडली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close