शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन
नवप्रहार
प्रतिनिधी : अंजनगाव सुर्जी
अंजनगाव सुर्जी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख श्री शुभम बाबूलाल कहार यांनी मुख्याधिकारी साहेब नगर परिषद अंजनगाव सुर्जी यांना महात्मा फुले मार्केट बुधवारा येथे बांधलेले ओट्याबाबत सविस्तर माहिती देणेबाबत निवेदन दिले मागील ६ ते ७ महिन्यापासून महात्मा फुले मार्केट बुधवारा मध्ये विकास कामाच्या नावाखाली फक्त शासनाची दिशाभूल करण्याचे काम नगर परिषद करीत आहे. तिथे मागील ५० ते ६० वर्षा पासून तिथिल गोर-गरीब जनता व्यवसाय करीत असून स्वता:चा उदरनिर्वाह चालवत होते. परंतु प्रशासन राज मध्ये नगर परिषद ने यांना नोटीस देऊन तात्त्काळ दुकाने खाली केले परंतु बांधकाम पूर्ण झाल्यावर सुद्धा या कडे प्रशासन कोणतेच प्रकारचे लक्ष देत नसून शुभम कहार यांनी मुख्याधिकारी साहेब यांच्या लक्षात आणून दिले . मुख्याधिकारी यांनी येत्या ०५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वसाधारण सभे मध्ये ठराव घेऊन आपणास लवकरच आपल्या हक्काचे जागा मिळणार असल्याचे मुख्याधकारी यांनी हमी दिले.व अधिकाऱ्यांना आदेश दिले. निवेदन देतांना शिवसेना शहरप्रमुख श्री.राजेंद्र किसनराव आकोटकर,श्री.सागर परळकर,श्री.नितीन निंबोकार ,मंगेश ढेंगे , शरद फिसके,सुनील गौर शेख रशीद,तसेच तमाम शिवसैनिक उपस्थित होते.