मुंबईचा गड उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने राखला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)
मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार एडव्होकेट अनिल परब हे 26000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले त्यांनी आपले भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार किरण शेलार यांचा दणदणीत पराभव केला. शिक्षक मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढत होणार होती असे बोलले जात होते परंतु प्रत्यक्षात मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर आणि शिक्षक भारतीचे उमेदवार श्री. सुभाष मोरे यांच्यात अटीतटीचा सामना झाला या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवाराचा 198 मताने विजय झाला.
मुंबईत झालेल्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विजयाने शिवसेनेत जोश व उल्हास जाणवत होता. पुन्हा एकदा मुंबई आमच्या ताब्यात असे अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार हे उच्चशिक्षित असतात आणि उच्चशिक्षित लोक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहेत असे प्रतिपादन अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केले.