श्री मळगंगा देवस्थान ट्रस्ट च्या निवडणूकीत सत्ताधारी मळगंगा पॅनलल २० जागा तर विरोधी माऊली मळगंगा परिवर्तन पॅनलला १ जागा .
पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – राज्यात नावलौकिक असलेल्या श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या २१ जागांसाठी झालेल्या मतमोजणी त सत्ताधारी मळगंगा पॅनलला २० जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळाले , तर विरोधी माऊली मळगंगा पॅनल १ जागा मिळाली , मोठ्या प्रमाणावर क्रॉस मतदान झाल्याने मतमोजणी ला मोठ्या प्रमाणावर विलंब लागला . अतिशय अटीतटीची लढत झाली .
काल रविवार दि . २ रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु होते , तदनंतर ४ .१५ वाजता सुरु झालेली मतमोजणी दिर्घ काळ लांबल्याने उमेदवार , त्यांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ तहान भूक विसरून विजयी गुलालाची वाट पाहत होते . अखेर रात्री १२ वाजता मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कवाद यांनी निवडणूक निर्णय जाहीर केला , त्यांना सहाय्य म्हणून देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक महेश ढवळे यांनी काम पाहिले . २१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकी साठी ४१ उमेदवार नशिब आजमावत होते , त्यामध्ये प्रामुख्याने श्री मळगंगा पॅनल चे उमेदवार वसंत बाबाजी कवाद [ कंसात मिळालेली मते ७९५ सर्वाधिक ] , विठ्ठल भाऊसाहेब कवाद [ ७२४ ] , शांताराम बापू कळसकर [ ६३५ ] , लक्ष्मण रामभाऊ ढवळे [ ६४१ ] , अमृता महादू रसाळ [ ७५१ ] , संतोष भाऊ रसाळ [७१३ ] , शांताराम भाऊ लंके [ ७९१ ] , ज्ञानेश्वर दगडू लंके [ ५८५ ], ठकाराम बाळू लंके [ ७४० ] , अनिल रघुनाथ लंके [ ७५४ ] , शंकर चंद्रकांत लामखडे [ ७०९ ] , ज्ञानेश्वर रामदास लामखडे [ ६७७ ] , रोहिदास हरिभाऊ लामखडे [ ५९३ ] , दिलीप यशवंत लाळगे [ ५५६ पराभूत ] , मंगेश सखाराम वराळ [ ५६० ] , सिमा संदीप वराळ [ ७३७ ], रामदास महादू वरखडे [ ६९१ ] , अशोक बापू वरखडे [ ५७८ ] , मोहिनी सोमनाथ वरखडे [ ५८१ ] , विश्वास ठकाराम शेटे [६८० ] , रामदास नानाभाऊ ससाणे [ ६५८ ] हे २१ उमेदवार असून यातील २० विजयी झाले .
विरोधी माऊली मळगंगा परिवर्तन पॅनल चे उमेदवार मोहन जयवंत कवाद [ कंसात मिळालेली मते [३६९ ] , शांताराम ठकाराम ढवळे [ ३४६ ] , सुनिल रघुनाथ पवार [ ३७५ ] , शिवाजी लक्ष्मण भुकन [ २६२ ] , मनोहर बाबाजी राऊत [ ४०५ ] , दत्तात्रय श्रीपत लंके [३४६ ] , देवराम गोविंद लामखडे [ ४३९ ] , राजेंद्र भागा लाळगे [ ५१६ ] , संतोष खंडू वराळ [ २७८ ] , राहूल भाऊसाहेब वराळ [ ३१४ ] , रावसाहेब आनंदा वराळ [ ३४८ ] , ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे [ ५३९ ] , संदीप रामचंद्र वरखडे [ ३७१ ] , अनिल शिवाजी शेटे [ एकमेव विजयी , ६३० ] हे १४ उमेदवार तर सर्व पराभूत अपक्ष उमेदवारां मध्ये काळूराम सहदेव गजरे [ ३९ ] सदानंद भिकाजी ढवळे [ ३३ ] , दिलीप रामचंद्र ढवण [ ५५ ] , रुपेश मारुती ढवण [ ५४ ] , दत्तात्रय खंडू भुकन [ १८२ ] , गणेश चंद्रकांत वराळ [ ६४ ] यांचा समावेश आहे . मतदान , मतमोजणी चा निकाल प्रक्रिया पुष्कर लॉन्स येथे पार पडली . निवडणूकीत गडबड, गोंधळ होवू नये म्हणून पारनेर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला . या निवडणूकीत सत्ताधारी पॅनल चे दिलीप यशवंत लाळगे हे ४ मतांनी पराभूत झाले , तर विरोधी माऊली मळगंगा परिवर्तन पॅनल चे अनिल शिवाजी शेटे हे ४ मतांनी एकमेव उमेदवार निवडून आले . सत्ताधारी मळगंगा पॅनलचे नेतृत्व बाबासाहेब कवाद निघोज नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कवाद , माजी सरपंच ठकाराम लंके , कन्हैय्या परिवाराचे अध्यक्ष शांताराम लंके यांनी केले, तर विरोधी माऊली मळगंगा पॅनल चे नेतृत्व संदीप पाटील फाऊन्डेशन चे अध्यक्ष सचिन वराळ , मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनिलराव पवार , मळगंगा यात्रा उत्सव समिती चे अध्यक्ष शिवाजीराव लंके यांनी केले .
या देवस्थान ट्रस्टचे ११८१ सभासद असून प्रत्यक्षात १०६९ म्हणजे शेकडा ९२.६३ टक्के सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला . तर २५ बाद मते झाले आहेत .अतिशय दीर्घ काळ मतमोजणी सुरू राहिल्याने सर्व उमेदवार , कार्यकर्ते , ग्रामस्थ व निवडणूक कर्मचारी कंटाळलेले दिसून आले . या निवडणूक प्रक्रियेसाठी ४० कर्मचाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात अपुऱ्या १५ कर्मचाऱ्यांनीच ही मतमोजणी प्रक्रिया राबविल्याने विलंब झाला . तीन मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष अंकुश गुंजाळ , दत्ता हांडे , सतीश मुळे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया राबविली गेली . क्षणा क्षणाला निकाल्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती , निकाल लांबणीवर पडत होता , दरम्यान मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी बाहेर थांबलेल्या कार्यकर्ते सायंकाळी ६ वाजल्यापासून ऐकीव माहितीवर च फटाक्यांची आतिषबाजी करत होते , त्यांचे नेते मंडळी त्यांना थांबण्यास सांगत होते , पण उत्साही कार्यकर्ते थांबण्याचे नावच घेत नव्हते .
निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कवाद यांनी अखेर उशिरा रात्री १२ वाजता मोजक्या कार्यकर्त्यां च्या उपस्थितीत मळगंगा पॅनलचे २० माऊली मळगंगा पॅनलचे १ उमेदवार विजयी झाल्याचे घोषित केले व निवडणूक प्रक्रिया शांततेने पार पडल्याचे जाहीर केले .