राज्य/देश

ई रिक्षा चालकाच्या घरी सापडला शहाजांहांचा खजिना 

Spread the love
 

कोलकाता  / नवप्रहार मीडिया 

               मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या उत्तर 24 परगणा जीह्यातील संदेसखाली पुन्हा एका नव्या घटनेने चर्चेत आला आहे. येथे एका ई रिक्षा चालकाच्या घरात शस्त्र साठा सापडला आहे. महत्वाचे असे की याच ठिकाणी रॅशन घोटाळ्याची चौकशी करण्यास गेलेल्या ईडीच्या पथकावर प्राणघातक हल्ला झाला होता. वर्षांनुवर्षे लैंगिक अत्याचार झालेल्या महिला रस्त्यावर काठ्या , रॉड आणि झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. इथल्या सरबेदिया भागात राहणाऱ्या अबू तालीम नावाच्या व्यक्तीच्या घरात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. 

ईडीवरच्या हल्ल्याच्या घटनेचा तपास करणारी सीबीआयची टीम गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अॅक्टिव्ह होती. या काळात सीबीआयने अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. शुक्रवारी (26 एप्रिल) सीबीआयला सूत्रांकडून माहिती मिळाली, की सरबेदिया भागातल्या एका घरात काही कागदपत्रं आणि बॉम्ब असू शकतात. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने संशयित घरात छापा टाकला. या घरात जमिनीखाली शस्त्रसाठा आढळला. यानंतर सीबीआयच्या टीमने एनएसजीला पाचारण केलं. एनएसजीची टीम अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली.

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
एनएसजीने कॅमेरा असलेला एक रोबो अॅक्टिव्ह केला आणि घराच्या आत पाठवला. एनएसजी अधिकारी बाहेरून रोबो ऑपरेट करत होते. काही वेळातच हा रोबो एक बॅग घेऊन बाहेर आला. त्यानंतर एनएसजी टीमने एका ठिकाणी वाळूच्या गोण्या टाकून सुरक्षित जागा तयार केली आणि रोबोटच्या मदतीने संशयित बॅग तिथे ठेवली. नंतर एनएसजीच्या बॉम्ब स्क्वाडने सर्व बॉम्ब निकामी केले. छाप्यादरम्यान सीबीआयने चार विदेशी पिस्तुलं, एक इंडियन रिव्हॉल्व्हर, एक पोलीस कोल्ट रिव्हॉल्व्हर, एक देशी बनावटीचं पिस्तूल अशी एकूण सात शस्त्रं आणि 348 काडतुसं जप्त केली. यामध्ये 9 एमएमची 120 काडतुसं, पॉइंट 45 कॅलिबरची 50 काडतुसं, पॉइंट 38ची 50 काडतुसं आणि पॉइंट 32ची 8 काडतुसं जप्त करण्यात आली. सीबीआयने घटनास्थळावरून राजकीय नेता शेख शाहजहानची अनेक ओळखपत्रं जप्त केली आहे. त्यात मतदार कार्ड, शस्त्र परवाना, आधार कार्ड यांचा समावेश आहे.

कोण आहे अबू तालिब?
या घरात राहणारा अबू तालिब हा व्यवसायाने ई-रिक्षा चालक आहे. तो तृणमूल काँग्रेसचे नेते हाफिझुल खान यांचा नातेवाईक असून शेख शाहजहानचा निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जातं आहे. सापडलेली शस्त्रं ही शेख शाहजहानची आहेत. ईडीवरच्या हल्ल्याच्या घटनेनंतर त्याने ही संबंधित ठिकाणी लपवली होती, अशी माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू तालिबने सहा महिन्यांपूर्वी ही खोली बांधली होती. त्याचं फ्लोअरिंग एक ते दीड महिन्यांपूर्वी झालं. जमिनीखाली शस्त्रं लपवण्यासाठी अबू तालिबने शाहजहानच्या आदेशाने फ्लोअरिंग करून घेतलं होतं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

5 जानेवारी रोजी हीच शस्त्रं लपवण्यासाठी शेख शाहजहानने ईडीच्या पथकाला घरात प्रवेश दिला नसेल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शाहजहानने आणखी शस्त्रं इतरत्र लपवून ठेवली आहेत का, ही शस्त्रं त्याने निवडणुकीच्या काळात वापरण्यासाठी जमा केली होती का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close