शाशकीय

पत्रकारांनी हत्यार उपसले ; घाटावरचे जेसीबी  डेपोत दिसले

Spread the love
अधिकाऱ्यांना खिशात ठेवण्याची भाषा बोलणारा जमिनीवर 
धामणगाव रेल्वे / विशेष प्रतिनिधी 
                  अधिकाऱ्यांना कथित रित्या मॅनेज करून मनमानी करणाऱ्या डेपो चालकाच्या विरोधात पत्रकारांनी आपल्या लेखणीचे हत्यार उपसताच अधिकाऱ्यांना खिशात घेऊन फिरण्याची भाषा करत हवेत उडणारा तो ‘टोपीबाज ‘ जमिनीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
                      तहसीलदारांना हाताशी घेऊन शासकीय नियम धाब्यावर बसवत मनमर्जी करणाऱ्या डेपो चालकाच्या अवैध कामाच्या विरोधात पत्रकारांनी हत्यार उपसताच तो जमिनीवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
नियमबाह्य रित्या सुरू होता उपसा – गोकुलसरा नदीपात्रातून नियमबाह्य उपसा सुरू होता. यंत्राने वाळू उपसा करण्यास मज्जाव असतांना सुद्धा आपल्या  तोऱ्यात असलेला तो ‘ टोपीबाज ‘ तहसीलदारांना कथित रित्या हाताशी घेऊन नियमबाह्य उपसा करीत होता.
पत्रकारांनी हत्यार उपसले आणि जेसीबी डेपोत दिसले –  गोकुलसरा घाटावर जेसीबी ने नदीपात्रातून वाळूचा उपसा सुरू होता. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या अवैध उपस्याच्या विरोधात मधामधातून काही बातम्या प्रसिद्ध होत होत्या.पण बातमी आली की काही दिवस अवैध उपसा बंद ठेवावा आणि नंतर तो पुन्हा सुरू करावा हा त्याचा नित्यक्रम बनला होता. पण गोकुलसरा घाटातून सुरू असलेल्या अवैध उपस्या विरोधात पत्रकारांनी लेखणीचे हत्यार उपसातच घाटावरील जेसीबी सर डेपोत पाहायला मिळत आहे.  ( क्रमशः)
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close