क्राइम
भाजपा आमदाराच्या पुतण्याची हत्या

पाटना / प्रतिनिधी
भाजप आमदार कविता पासवान च्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्यावर गोळीबार केला. यामध्ये कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारच्या कोढा विधानसभा मतदारसंघाच्या महिला आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवानवर गोळीबार झाला. कटिहार शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
नीरज पासवान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. माजी महापौर शिवराज पासवान हत्याकांड प्रकरणी तो आरोपी होता आणि नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. दरम्यान, भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर जवळच असलेल्या इतर लोकांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. एकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. हल्लेखोरांनी मारलेल्या दोन गोळ्या लागून नीरज पासवान गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले. नीरज पासवानला त्याच्या घराजवळच गोळी मारण्यात आली.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |