सामाजिक

अमरावती शहरातीळ अवैध धंद्याविरोधात शिंदे गट आक्रमक ; कारवाई साठी पोलीस आयुक्तांना निवेदन 

Spread the love
अमरावती / प्रतिनिधी
           शहरात अवैध रित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लर, पब यावर कारवाई व्हावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट ) गांच्या कडून पोलीस आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
 अमरावती शहरात गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर जसे (किचन 365,फ्रॅंक क्लब, एजंट जॅक, लिव्हीटेड -9, अथेना पब,क्लब -27) हे राजरोस पणे रात्रभर सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. तरुण युवक/युवतींमध्ये याचे कमालीचे आकर्षण बघावयास दिसून येत आहे. यातूनच पुढे ही तरुणाई व्यसनाधीन होवून वाममार्गांवर गेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती आता निर्माण झाली आहे. रात्रभर चालणाऱ्या या पब मध्ये तरुणाई मद्यपान,धूम्रपान, हुक्कापान तर करतातच,की आणखी कोणती वेगळ्या प्रकारची नशा तर करत नाहीत ना…? असा प्रश्न आता आमच्या समोर निर्माण झाला असून वेळीच या पिढीला यातून सावरणे गरजेचे झाले आहे,तशीही ही तरुणाई व्यसनाधीनतेच्या मार्गांवर प्रचंड वेगात धावत आहेच. बेधुंद अवस्थेत डी.जे च्या तालावर डिस्को फ्लोअर वर ही तरुणाई नाचतात, नाचता नाचता एखाद्याला धक्का लागला की भांडतात मग मारामाऱ्या करतात, मग या हॉटेल/पब चालकांनी भाड्याने ठेवलेल्या बाउंसर्स कडून स्वतः मार खातात असा ऐकंदरीत  उद्योग येथे चालत असावा,परंतु अश्यातून जर एखाद्याचे बरेवाईट झाले तर याची जबाबदारी घेणार कोण..? विशेष म्हणजे येथे फक्त जोडीदाराला घेऊनच या पबमध्ये प्रवेश मिळतो व स्त्रीवर्गाला येथे मोफत प्रवेश मिळतो आणि ईतरांना मात्र प्रवेश फी स्वरूपात किमान 2000/-रुपये मोजावे लागतात असे एकण्यात आहे. या तरुणाईला त्यांचे पालक अशा ठिकाणी जायची परवानगी खरंच देत असतील का..? आपला मुलगा/मुलगी रात्री अपरात्री घरातून कोणते खोटे कारण सांगून असल्या ठिकाणी जात असावे, स्वतःच्याच आईवडिलांना फसवून,यातूनच पुढे मग आपलं सर्वस्व गमावून बसतात. आपण या महान हिंदुस्थानात राहतो जिथली  संस्कृती ईतर देश स्वीकारतात आणि आपली तरुणाई मात्र त्यांच्या घाणेरड्या सावई घेत आहेत. यातून आपली तरुणाई भविष्यात कोणत्या मार्गांवर चालणार देवच जाणे.
किचन 365 सारख्या या हॉटेल/पब ला व्यवसाय करणे करिता कोणत्या स्वरूपाची परवानगी आहे..? यांना वेळेची मर्यादा घालून दिल्या गेली आहे का..? यात कोणते पदार्थ /सेवा / मुंबई पोलीस अधिनियमानुसार नमूद कोणती पब्लिक एंटरटेनमेंट करण्याची यांना परवानगी दिल्या गेली आहे का..? हुक्का विकण्याची यांना परवानगी मिळाली आहे का..? असे प्रश्न आपल्या कार्यालयला दिनांक 31/11/2023 रोजीच्या पत्राद्वारे विचारले असता, आपल्या पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे यांना कोणतीही परवानगी दिल्या गेली नसल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे. तरीही रात्रभर डी. जे, डिस्को फ्लोअर वर दारू विक्री, हुक्का यासारख्या बेकायदेशीर रित्या राजरोस पणे अशी हॉटेल्स /पब चालेणे ही शोकांतिका आहे, आम्ही सरकार मध्ये आहोत आपले लाडके मुख्यमंत्री ना श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. आपली संस्कृती टीकावी व ती रुजावी जेणेकरून तरुणाई वाममार्गाला नं जाता चांगल्या मार्गात राहावी अशा मताचे आम्ही लोक आहोत.
म्हणूनच आपणास शिवसेना अमरावती महानगर तर्फे विनंती करतो की यासर्व बेकायदेशीर रित्या रात्रभर चालणाऱ्या हॉटेल्स/पब, हुक्का पार्लर वर कायदेशीर कार्यवाही करून यांच्या मालकांवरही आपल्या अस्सल पोलिसिंगचा खाक्या दाखवावा .
         यावेळी  आशिष ठाकरे शिवसेना शहरप्रमुख , संतोष बद्रे शिवसेना महानगरप्रमुख
गुड्डु कत्तलवार (शिवसेना शहरप्रमुख बडनेरा)
वेदांत तालन (शिवसेना कामगारसेना चिटणीस )
चैतन्य कचरे (शिवसेना शहर संघटक प्रमुख )
मुकेश उसरे (शिवसेना शहर संघटक बडनेरा)
करण यादव (शिवसेना उपशह्रप्रमुख )
सुरेश चव्हाण (शिवसेना प्रणित वाहतूक सेना शहर प्रमुख) राजेश धोटे (शिवसेना उपशहरप्रमुख )
राजेश देवडा( शिवसेना उपशह्रप्रमुख )
मनोज पांडे (शिवसेना उपशहरप्रमुख )
शुभम साबळे (शिवसेना प्रभागप्रमुख)
चैतन्य काट्यारमल (शिवसेना प्रभागप्रमुख)
श्रेयस इंगळे (शिवसेना प्रभागप्रमुख)
प्रतीक सोळंके ,धिरज पाल ,सुरज श्रीखंडे ,नयन इंगोले , मयूर तायडे उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close