अपघात

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी-

घाटंजी- दी.१८/१/२३ रोजी घाटंजी ईस्तारी नगर येथिल वैभव कैलास कुडमते वय अंदाजे ३० वर्ष या युवकाने आपल्या राहत्या घरी सायंकाळी ४.३० च्या सुमारास स्वत:चे राहत्या घरात सिलींग फॅन ला ओढ़णी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ईस्तार नगर घाटंजी येथिल पंचायत समितीत कार्यरत सुनिता कैलास कुडमते यांचा वैभव मुलगा होता. त्याची आई नेहमी प्रमाणे कर्तव्यावर गेली गेली असताना घरी कोणी नसताना त्यांनी आत्महत्या केली ही वार्ता कळताच घटनेच्या स्थळी बघ्याची गर्दी जमली होती. सदर घटना घाटंजी पोलिस स्टेशनला कळताच पोलिस सिपाही दाभेकर,संदीप गोहणे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करुन शवविच्छेना करिता पाठविण्यात आला घटनेचा पुढील तपास घाटंजी ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात घाटंजी पोलिस करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close