दवलामेटी गणेश नगर च्या झेंडा प्रकरनात कार्यवाहीची मागणी!
डीसीपी, तहसीलदार,बीडीओ ना नागरिकांचे निवेदन!
ग्राम पंचायतच्या अवैध कार्यवाही वर संताप.
वाडी / नागेश बोरकर
आठवा मैल दौलामेटी परिसरसतील गणेश नगर येथील दोन समाजातील झेंडा प्रकरण ग्रा प व वाडी पोलिसांनी योग्य पध्दतीने न हाताळल्याने न्याय व चौकशीसाठी अन्यायग्रस्त नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यच्या दरबारात दाखल केले आहे.
या संदर्भात गणेशनगर येथील बौद्ध महिला, पुरुष यांनी वाडी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन आपबिती सांगितली तसेच नुकतेच या विषयाच्या अनुसंघाने पोलीस उपायुक्त, खंड विकास अधिकारी,व नागपूर ग्रामीण तहसीलदार प्रताप वाघमारे याना निवेदन सादर केले.
निवेदन व चर्चनुसार गणेश नगर परिसरात ते 15 वर्षं पासून निवास करीत आहेत. याच दरम्यान येथे निवास करणाऱ्या बौद्ध बांधवांनी दहा वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची विधिवत स्थापना केली व पंचशील ध्वज ही निर्माण केला. या ठिकाणी दरवर्षी हा समाज जयंती, पुण्यतिथी राष्ट्रीय ,धार्मिक कार्यक्रम संपन्न करीत असतात. आतापर्यंत कोणतेही पद्धतीची अडकाठी या ठिकाणी कोणीही निर्माण केली नाही. मात्र अचानक याच परिसरात जवळच राहणाऱ्या काही अन्य धर्मीय मंडळींनी कोणाशीही चर्चा न करता अथवा ग्रामपंचायतला विश्वासात न घेता अचानक येथील पंचशील व मूर्ती परिसराच्या शेजारीच दुसरा ध्वज निर्माण केला. त्यामुळे या ठिकाणी वाद निर्माण झाला तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार जवळ जवळ दोन धर्माचे ध्वज राहतील, कार्यक्रम होतील तर वादविवाद व भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या बाबीची तक्रार बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायत चे सरपंच गजानन रामेकर यांच्याकडे केली व त्यांना विषयाची कल्पना दिली व हा ध्वज इथून हटवण्याची विनंती केली असता योग्य कारवाईचे आश्वासन सरपंच गजानन रामेकर यांनी दिले. मात्र काही दिवसापर्यंत कार्यवाही झालीच नाही .दरम्यान ग्रा.प कडे तक्रार केल्याची बाब अन्य धर्मीय नागरिकांना समजताच ग्रामपंचायत मध्ये तक्रार का केली? या विषयावर या मंडळींनी तक्रारदार सोबत वादावादी ,रोज भांडण व जातीवादी शिवागीळ करून वातावरण तणावग्रस्त केले. त्यामुळे पुन्हा या मंडळींनी ग्रामपंचायत व वाडी पोलीस स्टेशनला धाव घेऊन या बाबीची रितसर तक्रार दाखल केली. मात्र ग्रामपंचायतीने यावेळीला आपली निष्पक्ष भूमिका बदलून पक्षपाती भूमिका स्वीकारण्याचा आरोप या तक्रारदारांनी केला. दसरा धम्मचक्र प्रवर्तन दिवस, रावण दहनाच्या दिवशी याच ठिकाणी एकाच वेळी कार्यक्रम घेतल्याने तणाव निर्माण झाला त्या मुळे पोलीस बंदोबस्तात दसरा व रावन दहन तणावात कार्यक्रम संपन्न झाले. या वसाहती मध्ये बौद्ध बांधवांची संख्या कमी असल्याने ही मंडळी त्यांना नियमितपणे शिवीगाळ करणे धमकी देणे ,जातीवाचक बोलणे या बाबीत वाढ झाल्याने या नागरिकांनी पुन्हा वाडी पोलीस स्टेशनला धाव घेतली मात्र वाडी पोलीस स्टेशन ने ही याबाबत वेळेवर कार्यवाही केली नाही . 2 महिन्यानंतर पोलिसांनी चौकशी ला प्रारंभ केले.
अखेर शेवटी तणाव लक्षात घेता विषयाची गांभीर्य लक्षात घेता ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन रामेकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव नागरगोजे, उप सरपंच अर्चना चौधरी,ग्रा.प सदस्य सतीश खोब्रागडे यांनी त्यांचे सहकारी प्रशांत श्रीवस्ताव व इतरांना सोबत घेऊन दिनांक 23 डिसेंम्बर ला अन्यायग्रस्त नागरिकांच्या अनुपस्थिती मध्ये घटनास्थळी येऊन तो दुसरा भगवा ध्वज त्या ठिकाणाहून हटवला व त्याच मैदानात काही अंतरावर नेऊन पुन्हा त्या ठिकाणी उभारला. तसेच या जागेची मोजमाप ही करून अन्य धर्मीय मंडळींना करून जागा हस्तांतरित केली .तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार अशी कारवाई ग्रामपंचायतला करताच येत नाही. अतिक्रमण ला वाव देणारा हे कृत ग्रामपंचायत कडून करण्यात आले.ही नियमबाह्य कारवाई ग्रामपंचायत ने कोणाच्या दबावत केली असा प्रश्नही त्यांनी निर्माण केला. दोन्ही ध्वज एकाच परिसरात असल्याने , दोन्ही धर्मीयांचे धार्मिक कार्यक्रम सोबत आल्यास व प्रतिदिन होणाऱ्या वाद विवादाला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अन्य अन्य धर्मस्थळाला किंवा ध्वजाला विरोध नसल्याचे सांगून त्यांना ग्रामपंचायत ने इतरत्र जागा द्यावी विनंती केली. मात्र ग्रामपंचायत ने अशा कोणत्याही पद्धतीची कारवाई न करता नेहमीसाठी हा तनाव कायम राहील अशीच कृती केल्याचे दिसून येते .
या संपूर्ण बाबीच्या तक्रारी अन्यायग्रस्त बौद्ध बांधवांनी नुकतेच डीसीपी झोन एक यांच्याकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले व योग्य कार्यवाही व चौकशी मागणी केली असता डीसीपी यांनी या प्रकरणात योग्य कारवाईचे आश्वासन दिले. तर यासोबतच खंड विकास अधिकारी पंचायत समिती नागपूर यांना निवेदन देऊन ग्रामपंचायतने केलेली कार्यवाही नियमबाह्य अधिकारक्षेच्या बाहेरची असल्याचे लक्षात घेता सरपंच व ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची निवेदन दिले तर तहसीलदार नागपूर ग्रामीण प्रताप वाघमारे यांना ही निवेदन देऊन या संदर्भात नियमाप्रमाणे कारवाई करण्यास विनंती केली . या प्रकरणात कायदेशीर कार्यवाही तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत कार्यवाहीची मागणी या मंडळींनी केली आहे. योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र शासन यांच्याकडेही तक्रार करण्याबाबत इशारा दिला आहे.
या संदर्भात सरपंच गजानन रामेकर यांना विचारणा केली असता दोन्ही स्थानिक रहिवाशी आहे.प्रतिमा जवळ दुसरा झेंडा लावल्याने भविष्यात वाद होऊ नये म्हणून तो झेंडा तेथून हटवून दूर अंतरावर लावण्यात आला.व ग्रा.प ने समाजहित लक्षात घेता त्यांना जागाही विभागून देण्यात आली व दोन्ही समाज बांधवांना शांती व सामंजस्याने राहून आप आपले कार्यक्रम साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. व काही अडचण असल्यास ग्रा.प ते दूर करेल असे दोन्ही बाजूला ही सांगण्यात आले आहे.प्रश्नन निकाली निघाला आहे असे मला वाटते.